Raj Thackeray & Uddhav Thackeray  Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Raj Thackrey Politics: राज ठाकरे यांचा नाशिक दौरा रद्द? काय घडले कारण?

Raj Thackeray; Raj Thackeray's visit abruptly cancelled, office bearers disappointed -मनसे प्रमुख राज ठाकरे आजपासून नाशिक दौऱ्यावर येणार होते. मात्र हा दौरा अचानक रद्द झाला आहे.

Sampat Devgire

Raj Thackrey News: मनसे प्रमुख राज ठाकरे आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या एकत्र येण्याची चर्चा सुरू आहे. या संदर्भात काही विषयांवर चर्चा देखील झाल्याचे बोलले जाते. प्रक्रियेला आता गती येणार असल्याचे बोलले जाते.

आगामी महापालिका निवडणुका आणि शिवसेना व मनसे या दोन्ही पक्षांचे एकत्रीकरण हा सध्या प्राधान्याचा विषय बनला आहे. या पार्श्वभूमीवर राज ठाकरे आजपासून दोन दिवसांच्या दौऱ्यावर नाशिकला येणार होते. मात्र बुधवारी सायंकाळी अचानक हा दौरा रद्द करण्यात आल्याचा निरोप देण्यात आला.

आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज ठाकरे यांचा नाशिकचा दौरा होता. त्याला उद्धव ठाकरे यांच्याशी युतीची पार्श्वभूमी होती. त्यामुळे या दौऱ्याकडे कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांना मोठी उत्सुकता होती. मात्र नाशिक शहरातील पावसाचे वातावरण आणि मुंबईतील काही कार्यक्रमांमुळे तो दौरा रद्द झाला आहे. आता येत्या 19 मेस राज ठाकरे नाशिकला येण्याची शक्यता आहे.

राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र येण्याची प्रक्रिया सुरू आहे. त्याबाबत काही राजकीय भूमिका वगळता दोन्ही बाजूंकडून अनुकूलता असल्याचे संकेत आहेत. त्या अनुषंगाने याबाबत आज चर्चा होण्याची शक्यता, पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केली.

शिवसेना नेते संजय राऊत काल नाशिक येथे होते. यावेळी त्यांनी मनसे प्रमुख राज ठाकरे यांच्या विषयी शिवसेनेत नेहमीच अनुकूल भूमिका राहिली आहे. त्यामुळे दोन्ही ठाकरे बंधू एकत्र येण्यास कोणाचाही अडसर येऊ शकत नाही. हा निर्णय संबंधित दोन्ही ठाकरेच घेतील, असे राऊत यांनी स्पष्ट केले होते.

मनसे आणि शिवसेना हे दोन्ही पक्ष सध्या विधिमंडळाच्या राजकारणात काहीशे उपेक्षित आहेत. जनमानसात दोन्ही पक्षांविषयी विशिष्ट भूमिका आणि पाठिंबा टिकून आहे. त्याचा मोठा फटका महायुतीला बसण्याची शक्यता आहे. महापालिका निवडणुकीत दोन्ही ठाकरे एकत्र आल्यास राज्यातील शहरी भागातील राजकीय वातावरण बदलण्याची शक्यता आहे. परिस्थितीत महाविकास आघाडीची भूमिका काय? हा प्रश्न शिल्लक राहतो.

--------

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT