Raj Thackeray-Atul Save Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Raj Thackeray News: राज ठाकरेंनी फोन फिरवताच‌ जिल्हा बॅंकेच्या वसुलीला तीन महिन्यांची स्थगिती मिळाली

सरकारनामा ब्यूरो

Nashik Bank News : नाशिक जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेच्या कठोर वसुलीच्या विरोधात नाशिक महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी पक्षप्रमुख राज्य ठाकरे यांची भेट घेत वसुलीला स्थगिती मिळावी, यासाठी साकडे घातले. त्यावर राज ठाकरे यांनी तत्काळ सहकारमंत्री अतुल सावे यांच्याशी संपर्क साधत फोनद्वारे चर्चा केली. यात, तीन महिने वसुली करणार नसल्याचे आश्वासन देण्यात आले. (After Raj Thackeray's phone call, Cooperative Minister postponed the recovery of Nashik District Bank)

नाशिक (Nashik) जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेवर (District Bank) सध्या प्रशासक आहे. बँकेची आर्थिक स्थिती अतिशय नाजूक असल्याने कर्जवुसीलाला (Debt recovery) प्राधान्य दिले जात आहे. त्याबाबत विशेष मोहीम राबवली जात आहे. त्याविरोधात मनसेने (MNS) राज ठाकरे (Raj Thackeray) यांच्याकडे पाठपुरावा केला होता.

जिल्हा सहकारी बँकेच्या सक्तीच्या आणि कठोर वसुलीच्या विरोधात मनसेचे प्रदेश सरचिटणीस अशोक मुर्तडक, प्रदेश उपाध्यक्ष रतनकुमार इचम, शहराध्यक्ष दिलीप दातीर, जिल्हा उपाध्यक्ष अनंत नाना सांगळे, विध्यार्थी सेनेचे जिल्हा अध्यक्ष महेश लासुरे, निफाड तालुका अध्यक्ष तुषार गांगुर्डे, नाशिक वाहतूक सेना जिल्हाध्यक्ष निकतेशजी धाकराव यांच्यासह जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या शिष्टमंडळाने पक्षाचे अध्यक्ष राज ठाकरे यांची पुणे येथे भेट घेतली.

बॅंकेकडून सक्तीची वसुली सुरू असून शेतकऱ्यांच्या सातबाऱ्यावर बॅंकेचा बोजा चढविला जात असल्याचे शिष्टमंडळातर्फे सांगण्यात आले. राज ठाकरे यांनी हा विषय गांभीर्याने घेऊन सहकारमंत्री अतुल सावे यांना दूरध्वनीवरून या प्रकरणात जिल्हा बँकेने केलेल्या गलथान कारभाराविषयी चर्चा केली. त्यानंतर सहकार मंत्री सावे यांनी तातडीने तीन महिन्यांसाठी नाशिक जिल्हा बँकेची कार्यवाही थांबवली जाईल आणि त्या दरम्यान नाशिक जिल्हातील शेतकऱ्यांसोबत बैठक घेऊन पुढील निर्णय घेण्यात येईल, असे सांगितले.

राज ठाकरे यांच्या प्रयत्नामुळे नाशिक जिल्हयातील सुमारे ६५ हजार शेतकऱ्यांना दिलासा मिळणार आहे. त्यांच्या वतीने ठाकरे यांचे आभार मानण्यात आले आहेत. शेतकऱ्यांतर्फे रावसाहेब आईतवडे, कैलास बोरसे, खेमराज कौर, दिलीप पाटील आदी उपस्थित होते.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT