Raj Thackrey, Uddhav Thackrey & Ashok Murtdak Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Raj Thackeray Politics: राज ठाकरेंच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर नाशिक मनसेमध्ये स्फोट, `या` नेत्याने सोडली साथ

Raj Thackrey; Ex Mayor Ashok Murtdak will join Shivsena UBT today-माजी महापौर अशोक मुर्तडक आज उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत शिवसेना ठाकरे पक्षात प्रवेश करणार आहेत.

Sampat Devgire

Ashok Murtdak News: विधानसभा निवडणुकीच्या धामधुमीतच महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला नाशिकमध्ये मोठा धक्का बसला आहे. विशेषता मनसे प्रमुख राज ठाकरे उद्या नाशिकला प्रचार सभेसाठी येत आहेत. त्याच्या पूर्वसंध्येलाच राज ठाकरे यांचा मोठ्या पदाधिकाऱ्याने पक्ष सोडला आहे.

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रदेश उपाध्यक्ष आणि माजी महापौर अशोक मुर्तडक यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला जय महाराष्ट्र करण्याचा निर्णय घेतला आहे. माजी महापौर मूर्तडक आज शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश करीत आहे. नाशिकच्या राजकारणाच्या दृष्टीने हा मोठा निर्णय आहे. त्याचा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या आधीच खिळखिळ्या झालेल्या संघटनेला मोठा धक्का बसणार आहे.

विशेष म्हणजे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे महापालिकेतील सत्तेच्या काळातील दोन्ही महापौर शिवसेना ठाकरे पक्षासोबत गेले आहेत. माजी महापौर ॲड यतीन वाघ यांनी यापूर्वीच शिवसेनेत प्रवेश केला आहे. श्री. मुर्तडक हे मूळचे शिवसेना पक्षाचे पदाधिकारी आहेत. ते 1997 पासून पंचवटीतील प्रभागातून सातत्याने नगरसेवक म्हणून निवडून येत आहेत. श्री मुर्तडक यांनी 2012 मध्ये त्यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेत प्रवेश केला होता. त्यानंतर दुसऱ्या टर्मला राज ठाकरे यांनी त्यांना महापौर पदाची संधी देण्यात आली होती. सध्या ते पक्षाचे प्रदेश उपाध्यक्ष म्हणून काम पाहत होते.

विधानसभा निवडणुकीच्या धामधुमीतच मनसेला मोठा धक्का बसला आहे. मनसेने यंदा पश्चिम विधानसभा मतदारसंघातून भाजपचे दिनकर पाटील तर पूर्व मतदार संघातून सानप यांना उमेदवारी दिली आहे. नाशिक मध्य मतदार संघातून मनसेचे अंकुश पवार यांनी यापूर्वीच निवडणुकीतून माघार घेतली आहे.

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या चाळीस पैकी 26 नगरसेवकांनी २०१७ मध्ये पक्ष सोडला होता. यातील बहुतांशी नगरसेवकांनी भारतीय जनता पक्षात प्रवेश केला होता. सध्या मात्र भारतीय जनता पक्षाला देखील गळती लागली आहे. भाजपचाही विविध नेत्यांनी शिवसेना ठाकरे पक्षाला पसंती दिली आहे. आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर या घडामोडी राजकीय दृष्ट्या मनसे आणि भारतीय जनता पक्षाला तोट्याच्या ठरणार आहेत.

----

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT