Nashik Politics: विधानसभा निवडणुकीची प्रक्रिया सुरू आहे. प्रचारातील आरोप प्रत्यारोपामुळे राजकीय वातावरण तापले आहे. त्यातच पोलिसांनी साडेतीनशे जणांना तडीपरीच्या नोटीस बजावल्याने चर्चेचा विषय ठरला आहे.
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आज जिल्ह्यात मनमाड मालेगाव आणि नाशिक येथे सभा होत आहेत. यावेळी विविध प्रमुख पदाधिकाऱ्यांचा प्रवेश होणार आहे. शिवसेनेतील हे प्रवेश राजकीय दृष्ट्या चर्चेचा विषय ठरले आहेत. तो सत्ताधारी भाजपला धक्का मानला जातो.
आज शिवसेनेच्या सभेत भारतीय जनता पक्षाच्या औद्योगिक कामगार संघटना सेलचे प्रमुख विक्रम नागरे आणि वंचित बहुजन आघाडीचे उत्तर महाराष्ट्राचे नेते पवन पवार यांसह साडेतीनशेहून अधिक समर्थक शिवसेनेत प्रवेश करणार आहेत. शिवसेना प्रवेशाचा हा निर्णय गेल्या आठवड्यात शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांच्या उपस्थितीत झाला होता. आज शुक्रवारी हा प्रवेश निश्चित झाला आहे.
भाजपच्या माजी नगरसेविका डॉ सीमा ताजणे यांचे पती कन्नू ताजने आणि माजी नगरसेविका श्रीमती नागरे यांचे चिरंजीव विक्रम नागरे हे भाजपचे प्रमुख नेते आहेत. त्यांचा आज शिवसेनेत प्रवेश होत असतानाच त्यांना नाशिक शहरातून तडीपार करण्याच्या नोटिसा बजावण्यात आल्या आहेत. निवडणूक प्रक्रियेच्या पार्श्वभूमीवर ही कारवाई केल्याचे पोलिसांनी सांगितले.
मतदानाच्या दोन दिवस आधी आणि मतमोजणी प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत या नेत्यांना शहरात प्रवेश बंदी करण्यात आली आहे. भारतीय जनता पक्षाला जय श्रीराम करताच या नेत्यांवर ही कारवाई झाल्याने पोलिसांच्या कारवाईची ही विशेष चर्चा होत आहे. भारतीय जनता पक्षाच्या विविध नेत्यांसह अनेक राजकीय कार्यकर्त्यांना पोलिसांनी तडीपार करण्याची सूचना केली आहे. त्यामुळे मतदान प्रक्रिया आणि पोलिसांची कारवाई हा चर्चेचा विषय आहे.
कार्यकर्त्यांवर दोन किंवा त्याहून अधिक गुन्हे दाखल आहेत, अशा 349 जणांची यादी पोलिसांनी तयार केली आहे. यापूर्वीही ३८८ जणांना पोलिसांनी कारवाईची नोटीस बजावली होती. त्यामुळे नाशिक शहरातील 737 जणांवर तडीपारी होणार आहे.
निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार विविध दक्षता घेण्याच्या सूचना पोलिसांना देण्यात आले आहेत. यंदाच्या निवडणुकीत पोलिसांकडून विशेष खबरदारी घेतली जात आहे. त्यामध्ये राजकीय नेते आणि वादग्रस्त कार्यकर्ते यांच्यावर खास लक्ष दिले जात असल्याचे पोलिसांनी सांगितले. निवडणूक प्रक्रिया शांततेत व सुरळीत पार पाडण्याचा भाग म्हणून ही कारवाई केली जात आहे.
विशेष म्हणजे हेलिकॉप्टरने प्रवास करणाऱ्या स्टार प्रचारकांच्याही तपासण्या केल्या जात आहेत. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचं मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या ही बॅगा सुरक्षा विभागाकडून तपासण्यात आल्या होत्या. त्यामुळे त्यावर चर्चा घडली. यासंदर्भात विरोधी पक्षाच्या नेते आणि कार्यकर्त्यांना टार्गेट करण्यात येत असल्याची देखील तक्रार आहे.
पोलिस प्रशासनाने नाशिक शहरात भाजपचे काही पदाधिकारी शिवसेनेत प्रवेश करणार असल्याची घोषणा होतच. त्यांना तडीपारची नोटीस मिळाली आहे. ही कार्य पूर्वीच प्रस्तावित असू शकतो. मात्र त्याचा मुहूर्त पाहता हा योगायोग की सत्ताधारी पक्षाकडून पडद्यामागून खेळण्यात आलेला राजकीय डाव, अशी चर्चा आता सुरू झाली आहे.
-----
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.