Raj Thakre Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

राज ठाकरे यांनी नाशिकचे १२३ शाखा अध्यक्ष जाहीर केले

Sampat Devgire

नाशिक : महापालिका निवडणुकीच्या (NMC Election) पार्श्‍वभूमीवर संघटना (Streangthen NMS Organisation) मजबुती करण्याचा भाग म्हणून १२३ शाखा अध्यक्ष (123 Branch president) नियुक्त करताना शहराध्यक्षपदी दिलीप दातीर, (Dilip Datir) तर जिल्हाध्यक्षपदी अंकुश पवार (Ankush Pawar) यांची नियुक्ती झाली. सचिन भोसले (Sachin Bhosle) यांच्याकडे समन्वयकपदाची जबाबदारी सोपविण्यात आली आहे.

मनसे (MNS) अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thakre) यांनी नाशिकच्या पदाधिकाऱ्यांची खांदेपालट करताना नवीन चेहऱ्यांना संधी दिली नाही, परंतु बदल करताना शहराध्यक्षांना जिलह्याचे तर जिल्हा अध्यक्षांना शहराचे अध्यक्ष केले. त्यामुळे ही विद्यमान पदाधिकाऱ्यांना पदोन्नती की पदावनती, याबद्दल नियुक्ती केलेल्या पदाधिकाऱ्यांसह कार्यकर्ते संभ्रमात पडले आहेत.

संघटनात्मक बांधणीचा भाग म्हणून मनसेच्या १२३ शाखाध्यक्षांना गुरुवारी नियुक्ती देण्यात आली. त्याचबरोबर शहर व जिल्हा कार्यकारिणीत बदल करण्यात आले. जिल्हाध्यक्ष असलेल्या दिलीप दातीर यांना शहराध्यक्षपदाची जबाबदारी देण्यात आली. शहराध्यक्ष असलेले अंकुश पवार जिल्हाध्यक्ष म्हणून काम पाहणार आहे. अनंता सूर्यवंशी यांच्याकडून जिल्हाध्यक्षपदाची जबाबदारी काढून घेण्यात आली. प्रदेश उपाध्यक्ष असलेले ॲड. रतनकुमार ईचम यांच्याकडे जिल्हाध्यक्षपदाची जबाबदारी सोपविण्यात आल्याने पदोन्नती दिली की पदावनती झाली, असा सवाल मनसे कार्यकर्त्यांमधून उपस्थित केला जात आहे.

नवे पदाधिकारी असे, दिलीप दत्तु दातीर (शहराध्यक्ष), अंकुश अरूण पवार (जिल्हाध्यक्ष), अॅड रतनकुमार इचम (जिल्हाध्यक्ष), सचिन भोसले (शहर समन्वयक), विभाग अध्यक्ष - नितिन साळवे व सत्यम खंडाळे (मध्य विधानसभा), रामदास दातीर व योगेश दत्तात्रय लभडे ( पश्चिम विधानसभा), भाऊसाहेब निमसे व विक्रम कदम (पुर्व विधानसभा).

हॉटेल एसएसके येथे झालेल्या नियुक्ती बैठकीवेळी युवानेते अमित ठाकरे, ज्येष्ठ नेते बाळा नांदगावकर, नितीन सरदेसाई, शिरीष सावंत, अनिल शिदोरे, किशोर शिंदे, संदीप देशपांडे, अविनाश जाधव, अमेय खोपकर, योगेश परुळेकर, प्रदेश सरचिटणीस अशोक मुर्तडक, ज्येष्ठ नगरसेवक सलीम शेख, नगरसेवक योगेश शेवरे, विभाग अध्यक्ष सत्यम खंडाळे, नितीन साळवे, भाऊसाहेब निमसे, विक्रम कदम, रामदास दातीर व योगेश लभडे आदी उपस्थित होते.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT