Rajabhau Waje Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Rajabhau Waje News: मतमोजणी आधीच राजाभाऊ वाजेंचा भरतोय जनता दरबार

Rashmi Mane

Rajabhau Waje News: लोकसभा निवडणुकीचा निकाल येत्या 4 जूनला जाहीर होणार आहे. मतमोजणीला दोन दिवसांचा कालावधी आहे. मात्र नाशिकमध्ये वाजे समर्थकांचा उत्साह त्या आधीच ओसंडू लागला आहे.

नाशिक मतदारसंघातून शिवसेना शिंदे गटाचे खासदार हेमंत गोडसे उमेदवार आहेत. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उमेदवार राजाभाऊ वाजे आहेत. या दोन्ही उमेदवारांच्या समर्थकांनी आपणच विजयी होणार असा दावा केला आहे.

वाजे यांच्याकडे ते आजच खासदार झाले की काय? अशी स्थिती आहे. त्यांच्या संपर्क कार्यालयात मतदारसंघाच्या विविध भागातून रोज शेकडो नागरिक त्यांना शुभेच्छा देण्यासाठी येत आहेत. महाविकास आघाडीच्या घटक पक्षांचे पदाधिकारी वाजे यांना निकाला आधीच विविध सूचना आणि मागण्या सांगू लागले आहेत.

मतदान संपल्यानंतर मतमोजणीसाठी पंधरा दिवसांचा कालावधी होता. मात्र मतदारसंघाच्या विविध भागात झालेले मतदान आणि नागरिकांचा प्रतिसाद यावर विविध दावे प्रति दावे केले जात आहेत. त्यासाठी मतदारसंघातून रोज शेकडो कार्यकर्ते वाजे (Rajabhau Waje) यांना शुभेच्छा देण्यासाठी येत आहेत. येणाऱ्या प्रत्येक कार्यकर्ता त्याच्या गावातून किती आघाडी मिळेल, हा आकडाही सांगत असतो. त्यामुळे सध्या उमेदवार वाजे यांना या नागरिक आणि कार्यकर्त्यांच्या भेटीगाठी सकाळपासून सायंकाळपर्यंत उसंतही मिळत नाही, अशी स्थिती आहे.

निवडणुकीच्या कालावधीत दीड महिना सिन्नर तालुक्यातील कार्यकर्ते आणि नागरिकांना भेटू शकलो नव्हतो. त्यामुळे गेल्या आठवड्यात चार दिवस सबंध तालुक्यातील कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांची प्रत्यक्ष भेट घेऊन चर्चा केली. सध्या मतदारसंघाच्या सर्व भागातून नागरिक येतात. त्यांनी या निवडणुकीत महाविकास आघाडीसाठी (Mahavikas Aghadi) खूप परिश्रम घेतले आहेत. त्यामुळे त्यांची भेट चर्चा आवश्यक आहे. त्यांचे म्हणणे सध्या ऐकून घेत आहे, असे वाजे यांनी 'सरकारनामा'ला सांगितले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT