Sanjay Raut : "आम्ही गोट्या खेळायला बसलेलो नाही, मी सांगलीवर बोलेन अन् बोलणारच, " राऊतांच्या निशाण्यावर कोण?

Sanjay Raut On Exit Polls : "महाविकास आघाडी किमान 30 ते 35 जागा जिंकत आहे. एक्झिट पोलची आम्हाला गरज नाही," असं संजय राऊतांनी सांगितलं.
sanjay raut
sanjay rautsarkaranama

Sanjaykaka Patil Vs Vishal Patil Vs Chandrahar Patil : सांगलीत तीन पाटलांमध्ये थेट लढत झाली. भाजपनं संजयकाका पाटील यांना तिसऱ्यांदा उमेदवारी दिली. तर, काँग्रेसला विश्वासात न घेता ठाकरे गटानं चंद्रहार पाटील यांना उमेदवारी जाहीर केली. त्यामुळे विशाल पाटील यांनी काँग्रेसमध्ये बंडखोरी करत अपक्ष चंद्रहार पाटील आणि संजयकाका पाटील यांच्याविरोधात शड्डू ठोकला.

आमदार विश्वजित कदम ( Vishwajeet Kadam ) यांनी महाविकास आघाडीचे घटक चंद्रहार पाटील ( Chandrahar Patil ) यांच्यासाठी प्रत्यक्षपणे काम केलं. पण, अप्रत्यक्षपणे मित्र विशाल पाटलांसाठी कदम यांनी जिवाचं रान केल्याची चर्चा सांगलीसह राज्यात रंगली आहे. यातच लोकसभा निवडणुकीपूर्वी एक्झिट पोलचे आकडे समोर आले आहेत.

यानुसार विशाल पाटील ( Vishal Patil ) यांना एक्झिट पोलमध्ये आघाडी मिळताना दिसत आहे. तर, विद्यमान खासदार संजयकाका पाटील आणि चंद्रहार पाटील यांना धक्का बसताना दिसत आहे. त्यामुळे विश्वजित कदम यांनी विशाल पाटलांचा विमान दिल्लीला लॅण्ड केल्याचं बोललं जात आहे. यावरून शिवसेना ( ठाकरे गट ) खासदार संजय राऊत ( Sanjay Raut ) यांनी इशारा दिला आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

"आम्हाला प्रत्येक गोष्ट माहिती"

"आम्हाला महाराष्ट्रात काय होते, हे माहिती आहे. विदर्भ आणि पश्चिम महाराष्ट्रात काय निकाल लागणार, कोणता अपक्ष जिंकणार हे सुद्धा मला माहिती आहे. मी सांगलीवर बोलेन आणि बोलणारच आहे... आम्हाला प्रत्येक गोष्ट माहिती आहे. आम्ही येथे गोट्या खेळायला बसलेलो नाही आहोत," असं राऊतांनी ठणकावून सांगितलं आहे.

"एक्झिट पोलची आम्हाला गरज नाही"

"महाविकास आघाडी किमान 30 ते 35 जागा जिंकत आहे. एक्झिट पोलची आम्हाला गरज नाही. आम्ही जमिनीवरचे कार्यकर्ते आहोत. उद्धव ठाकरेंनी महाराष्ट्रात झंझावात आणि वादळ निर्माण केलं. त्यामुळे जनतेचा कल आम्हाला माहिती आहे. त्यासाठी तपस्या आणि साधनेची गरज आम्हाला नाही," असं म्हणत राऊतांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना टोला लगावला आहे.

sanjay raut
Gopichand Padlkar : जयंत पाटलांना मोठेपणा करायची सवय; ते तर डबक्यात पोहणारा मासा; पडळकरांची टीका

"ज्याची खावी पोळी त्याची वाजवावी टाळी"

"महाराष्ट्रात आणि देशात काय होणार हे मला माहिती आहे. आम्ही सरकार बनवत आहोत. कोणी किती आकडे दाखवू. एक्झिट पोल बनविणाऱ्या 100 कंपन्या आहेत. ज्याची खावी पोळी त्याची वाजवावी टाळी, असं एक्झिट पोलचं आहे," अशी टीका शिवसेना खासदार ( ठाकरे गट ) संजय राऊत यांनी केली आहे.

sanjay raut
Lok Sabha Election 2024 : 'एवढ्या' फेऱ्यानंतर कळणार सांगलीचा 'पाटील' कोण?

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com