Rajabhau Waje Plantation Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Rajabhau Waje Politics: आईच्या दशक्रियेला खासदार वाजेंचा वृक्ष संवर्धनाचा संदेश!

Sampat Devgire

Rajabhau Waje News: खासदार राजाभाऊ वाजे यांच्या मातोश्री रोहिणी वाजे यांचा दशक्रिया विधी रविवारी झाला. यानिमित्ताने जिल्हा आणि विविध भागातील राजकीय सामाजिक क्षेत्रातील कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी खासदार वाजे यांनी वृक्षारोपण आणि पर्यावरणाचा कृतिशील संदेश दिला.

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार वाजे यांच्या मातोश्री (कै) रोहिणीताई प्रकाश वाजे यांचे नुकतेच निधन झाले. त्या देगलूर (नांदेड) येथील राजूरकर कुटुंबातील होत्या. १९६४ मध्ये त्यांचा विवाह सिन्नरचे तत्कालीन आमदार शंकरराव बाळाजी वाजे यांचे चिरंजीव प्रकाश वाजे यांच्याशी झाला होता.

त्यावेळी हे कुटुंब तालुक्यातील एक प्रगत आणि यशस्वी व्यावसायिक आणि सामाजिक क्षेत्रात अग्रेसर असलेलं कुटुंब होतं. रोहिणीताई यांनी जवळपास ६० वर्ष या कुटुंबातील राजकीय आणि सामाजिक वारसा चालविला.

त्यांचा विवाह झाला तेव्हा त्या आमदारांच्या घरी सून म्हणून आल्या. ३० ऑगस्टला त्यांचे निधन झाले. तेव्हा त्या खासदारांच्या आई होत्या. राजकीय आणि सामाजिक क्षेत्रात प्रकाश वाजे यांनी काम केले. त्यांना रोहिणीताई यांची समर्थ साथ होती.

त्यांच्या निधनानंतर गेल्या दहा दिवसात विविध क्षेत्रातील शेकडो नागरिक आणि कार्यकर्त्यांनी खासदार वाजे यांच्या निवासस्थानी भेट दिली. रोहिणीताई वाजे यांना आपल्या शोक भावना व्यक्त केल्या. त्यांचा दशक्रिया विधी सिन्नर येथे झाला. यावेळी मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते. या नागरिकांना श्रद्धांजली म्हणून पर्यावरण रक्षणाचा संदेश खासदार वाजे यांनी आपल्या कृतीतून दिला.

या निमित्ताने सिन्नर नगरपरिषदेतर्फे माझी वसुंधरा अभियान सुरू करण्यात आले आहे. यानिमित्त झाडे जगवा झाडे वाचवा असा संदेश देत वानप्रस्थ फाउंडेशन या संस्थेच्या वतीने वड आणि पिंपळाची झाडे लावण्यात आली. शहर आणि परिसरातील पर्यावरण संवर्धनासाठी कार्यकर्ते आणि नागरिकांनी आपल्या पूर्वजांच्या स्मरणार्थ झाडे लावावी, असे आव्हान यावेळी करण्यात आले.

सिन्नरच्या वानप्रस्थ फाउंडेशन तर्फे तालुक्यात वृक्षारोपणाच्या चळवळीला गती देण्यात आली आहे. तालुक्यातील अनेक गावांमध्ये नागरिकांच्या निधनानंतर कुटुंबात दशक्रिया विधी साजरा केला जातो. यावेळी संबंधित व्यक्तीच्या स्मरणार्थ वृक्षारोपण करण्याची प्रथा चळवळ म्हणून सुरू करण्यात आली आहे.

दुष्काळाची पार्श्वभूमी असलेल्या या तालुक्यात पर्यावरण संवर्धनाला गती आली आहे. प्रत्येक नागरिकाने आपल्या कुटुंबातील प्रिय व्यक्तीच्या स्मरणार्थ झाडे लावावीत. त्यांचे संगोपन करावे, असे आवाहन या निमित्ताने आज देखील करण्यात आले. त्याला शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार वाजे यांनी कृतिशील पाठिंबा आणि संदेश दिला आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT