Rajabhau Waje Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Eknath Shinde Politics: ऑपरेशन टायगर; उद्धव ठाकरेंच्या खासदारांचे कानावर हात!

Rajabhau Waje; Shivsena UBT MPs mocked over Operation Tiger of Eknath Shinde-उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ऑपरेशन टायगरची केवळ माध्यमांमध्येच चर्चा असल्याचा ठाकरेंच्या खासदारांचा दावा.

Sampat Devgire

Rajabhau Waje news: राज्यात सध्या शिवसेना ठाकरे पक्षाच्या खासदारांबाबत ऑपरेशन टायगर चर्चेत आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून ठाकरेंचे सहा खासदार संपर्कात असल्याचा दावा केला जात आहे. गेल्या दोन दिवसांपासून सुरू असलेल्या या चर्चेमुळे खळबळ उडाली आहे.

महाविकास आघाडीला ऑपरेशन टायगर हा मोठा धक्का मानला जातो आहे. प्रत्यक्षात असे काही राजकीय डावपेच सुरू आहेत का? याची चाचपणी सर्वच नेते घेत आहेत. शिवसेना एकनाथ शिंदे पक्षाचे नेते वगळता अन्य कोणी त्यावर ठामपणे विधान केलेले नाही.

यासंदर्भात नाशिकचे खासदार राजाभाऊ वाजे यांच्याशी संपर्क केला. ते सध्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या कामकाजासाठी दिल्लीत आहेत. त्यांनी ऑपरेशन टायगर बाबत अनभिज्ञता व्यक्त केली.

खासदार वाजे म्हणाले, विविध वृत्तसंस्थांकडून याबाबत मला विचारणा केली जात आहे. आज सकाळी देखील एका वृत्तवाहिनी कडून विचारणा झाली. मात्र असा कोणताही प्रकार माझ्या कानावर अद्याप आलेला नाही. माझ्याशी कोणीही संपर्क केलेलं नाही आणि तसे घडण्याची शक्यता देखील नाही, असे त्यांनी स्पष्ट केले.

महाराष्ट्रात शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाचे नऊ खासदार आहेत. यातील सहा खासदार आपल्या संपर्कात असल्याचा दावा उपमुख्यमंत्री शिंदे पक्षाचे विविध नेते सातत्याने करीत असतात. सध्या शिवसेना शिंदे पक्षाकडून ठाकरे पक्षाचे कार्यकर्ते फोडण्यासाठी दिवस-रात्र प्रयत्न सुरू आहेत.

शिवसेना शिंदे पक्षाचे नेते विविध प्रयोग केले जात आहेत. सत्तेचा आणि सत्तेच्या माध्यमातून तिजोरीचा मनसोक्त उपयोग केला जात आहे. त्यामुळे शिवसेना शिंदे पक्ष स्वबळावर नव्हे तर शिवसेना ठाकरे पक्षाचे नेते आणि लोकप्रतिनिधी फोडून उद्धव ठाकरे यांना नामोहरम करण्याचा प्रयत्न आहे.

सध्या त्यांचे तेच एकमेव राजकीय धोरण असल्याचे स्पष्ट झाले आहे. ऑपरेशन टायगर हा प्रकार खासदार फोडण्याची संबंधित असल्यामुळे शिवसेनेचे प्रवक्ते आणि खासदार संजय राऊत यांनी देखील त्याची खिल्ली उडवली आहे.

शिवसेना ठाकरे पक्ष नव्हे तर खुद्द एकनाथ शिंदे यांचे आमदार कोणाच्या संपर्कात आहेत, हे त्यांनी तपासून पहावे, असे खासदार राऊत यांनी म्हटले आहे. शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाच्या खासदारांनी देखील कानावर हात ठेवले आहेत. त्यामुळे नक्की ऑपरेशन टायगर म्हणजे आहे तरी काय? अशी चर्चा आहे.

-------

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT