Rajabhau Waje News: नाशिक पुणे हाय स्पीड रेल्वेचा प्रकल्प संथ झाला आहे. या मार्गात बदल करण्याचा घाट राजकीय स्तरावर सुरू आहे. त्याला खासदार राजाभाऊ वाजे यांनी विरोध दर्शवला आहे.
नाशिक पुणे हाय स्पीड रेल्वे हा प्रकल्प प्राधान्याने राबविण्याची मागणी होत आहे. या संदर्भात रेल्वेचे सर्वेक्षण आणि भूसंपादनाची कारवाई देखील सुरू झाली होती. मात्र आता त्यात बदल होऊ घातले आहेत. त्यामुळे नाशिकचे लोकप्रतिनिधी अस्वस्थ आहेत. या संदर्भात शिवसेनेचे खासदार राजाभाऊ वाजे यांनी पुढाकार घेतला आहे.
या रेल्वे प्रकल्पात शिर्डी आणि अहिल्यानगर या शहरांचा समावेश करण्याचे घाटत आहे. रेल्वेमंत्री अश्विनी कुमार पुणे दौऱ्यावर असताना त्यांनी याबाबत सुतोवाच केले होते. त्यामुळे या प्रकरणाला राजकीय वळण लागले आहे. अनेकांनी यामध्ये मंत्री विखे पाटील यांचा मतदारसंघ असल्याने शिर्डीचा समावेश होत असल्याची चर्चा सुरू केली होती.
यासंदर्भात शिवसेना ठाकरे पक्षाचे खासदार वाजे यांनी नुकतीच रेल्वेमंत्री अश्विनी कुमार यांची भेट घेतली. यावेळेस त्यांनी हा प्रकल्प जुन्या मार्गानेच करण्यात यावा. यामध्ये शिर्डी आणि अहिल्यानगरचा समावेश केल्यास अंतर आणि प्रवासाचा कालावधी दोन्ही मध्ये वाढ होईल. याशिवाय प्रवाशांची गैरसोय देखील होणार आहे. त्यामुळे नाशिक ते पुणे जुन्या मार्गानेच रेल्वे करावी अशी मागणी केली.
या रेल्वे प्रकल्पासाठी जवळपास वीस टक्के जमीन संपादित करण्यात आली आहे. प्रशासकी स्तरावर त्याला मंजुरी देखील देण्यात आली आहे. त्यामुळे आता नवा बदल केल्यास प्रकल्प आणि त्याचा कालावधी लांबण्याची शक्यता आहे. त्यामुळे नाशिक संगमनेर नारायणगाव आणि चाकण मार्गे पुणे या मार्गानेच हाय स्पीड रेल्वे न्यावी असा आग्रह त्यांनी धरला.
माजी मंत्री बाळासाहेब थोरात तसेच अन्य काही नेत्यांनी देखील नाशिक पुणे हायस्पीड रेल्वे मूळ प्रकल्पानुसार करण्यात यावी. यामध्ये शिर्डीचा समावेश करू नये, असा आग्रह धरला आहे. या निमित्ताने मंत्री विखे पाटील आणि अन्य असा राजकीय सामना रंगण्याची चिन्हे आहेत. त्यात सध्या तरी खासदार वाजे यांनी नाशिककरांच्या हिताचा विचार करून विखे पाटील यांना लाल झेंडा दाखवला आहे.
------
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.