Eknath Shinde Politics: एकनाथ शिंदे साहेब, नव्या घोषणांआधी ‘त्या’ आश्वासनांचे काय झाले?...

Eknath Shinde; Shivsena Shinde Group offers funds for development and election to join party-उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज आभार दौऱ्यासाठी नाशिकला सभा घेत आहेत.
Eknath Shinde
Eknath ShindeSarkarnama
Published on
Updated on

Eknath Shinde News: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पक्षात प्रवेश झाल्याच्या बातम्या रोजच येतात. अनेकांनी या पक्षात जाण्याची मानसिकता केली आहे. पक्षाचे पदाधिकारी ही रोज नव्या प्रतिस्पर्ध्याला गाठून शिवसेना शिंदे पक्षात त्याचा प्रवेश घडवत आहेत.

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज आभार दौऱ्यानिमित्त नाशिकला सभा घेणार आहेत. त्यात ते अनेक नवी आश्वासने देण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर त्यांनी याआधी दिलेल्या आश्वासनांची अंमलबजावणी केव्हा होणार याची चर्चा सुरू आहे.

Eknath Shinde
Narhari Zirwal Politics: दूध का दूध, पानी का पानी...! भल्या पहाटे उठून मंत्री झिरवाळ यांनी अडवला टँकर!

उपमुख्यमंत्री शिंदे केव्हाही आणि कोणासाठीही उपलब्ध असतात. एखादा पदाधिकारी किंवा नेता त्यांच्या शिवसेना एकनाथ शिंदे पक्षात प्रवेश करणार असेल तर थेट त्या व्यक्तीशी चर्चा करतात. त्याला हवे ते आश्वासन देऊन टाकतात, अशी चर्चा सध्या सगळीकडे सुरू आहे.

Eknath Shinde
Devyani Pharande politics: ‘ड्रग्ज’च्या प्रश्नावर आमदार देवयानी फरांदे झाल्या आक्रमक!

मात्र यातूनच उपमुख्यमंत्री शिंदे यांनी यापूर्वी मुख्यमंत्री असताना नाशिककरांना अनेक आश्वासने दिली होती. यातील काही आश्वासनांचे आदेश देखील निघाले. मात्र त्यावर कार्यवाही झाली का? हा गंभीर प्रश्न आहे. याबाबत आता नाशिकच्या कार्यकर्त्यांनाही प्रश्न निर्माण झाला आहे.

महापालिकेत भारतीय जनता पक्षाचे सत्ता असताना तत्कालीन आयुक्त तुकाराम मुंडे यांनी घरपट्टीत प्रचंड वाढ केली होती. त्या विरोधात शहरवासीयांनी आंदोलन देखील केले होते. भारतीय जनता पक्षाच्या आमदारांनी त्यावर मुख्यमंत्र्यांचा अनेकांकडे घरपट्टी कमी करण्याची मागणी केली होती. मात्र ते प्रत्यक्षात आले नाही.

या संदर्भात मुख्यमंत्री शिंदे यांनी मात्र तडकाफडकी निर्णय जाहीर केला होता. त्याबाबतचा अध्यादेश देखील काढण्यात आला होता. मात्र घरपट्टी अद्याप जशी होती तशीच आहे. निवासी आणि अनिवासी दोन्ही घरपट्टी वाढ माफ करणार, असे मुख्यमंत्री शिंदे म्हणाले होते. मात्र त्यावर कारवाई झाली नाही.

या आश्वासनांबाबत कार्यवाही केव्हा होईल याची नाशिककरांना प्रतीक्षा आहे. शहरातील सिडकोची वसाहत व तेथील प्रश्न हा गंभीर विषय आहे. यासंदर्भात सिडकोची घरे फ्री होल्ड करणार असे आश्वासन उपमुख्यमंत्री शिंदे यांनी दिले होते. महापालिकेच्या नोकर भरतीला परवानगी देण्यासाठी आस्थापना खर्चाची मर्यादा वाढवून देऊ, असे आश्वासन नगर विकास मंत्री म्हणून शिंदे यांनी दिले होते.

नाशिक शहराचा नवा आकृतीबंध मंजूर करण्याबाबत तातडीने निर्णय घेऊ. अशी अनेक आश्वासने यापूर्वी नाशिककर यांना मिळाली आहेत. त्यावर कार्यवाही कधी होणार हा सगळ्यांचा प्रश्न आहे. आज उपमुख्यमंत्री शिंदे आभार दौऱ्यासाठी येत आहेत. या दौऱ्यात ते विरोधक आणि प्रतिस्पर्धी शिवसेना ठाकरे पक्षाच्या नेत्यांना आणि माजी नगरसेवकांना मधाचे बोट लावत आहेत. काही लोकांनी प्रवेश करावेत, असे त्यांचे प्रयत्न आहेत. मात्र नाशिककरांच्या प्रश्नांचे काय? यापूर्वी खुद्द उपमुख्यमंत्री शिंदे यांनीच आश्वासने दिली होती ती पाळली जाणार का याची विचारणा होत आहे.

-------

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com