Ram Satpute BJP corporators Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Ram Satpute BJP corporators : भाजपच्या बैठकीला नगरसेवक गैरहजर; राम सातपुते संतापले, म्हणाले, ‘पक्षाला आप व्हायला वेळ लागणार नाही’

Most newly elected BJP corporators skipped the Ahilyanagar district executive meeting, prompting Ram Satpute to raise concerns over party discipline and organisational commitment : अहिल्यानगर भाजपच्या जिल्हा कार्यकारिणी बैठकीत नगरसेवकांच्या गैरहजेरीवरून सातपुतेंची नाराजी; सुजय विखे पाटलांचा जिल्हा परिषदेत 60 जागा जिंकण्याचा दावा

Pradeep Pendhare

Ahilyanagar BJP meeting : अहिल्यानगर जिल्हा भाजप कार्यकारणी बैठकीत नवनिर्वाचित नगरसेवकांच्या गैरहजेरीवरून आमदार राम सातपुते यांनी संताप व्यक्त केला आहे.

भाजपच्या चिन्हावर निवडून आलो आहोत, याचा विचार नगरसेवकांनी करायला हवा. कार्यकर्ता चुकत राहिला, तर भाजपला आम आदमी पार्टी व्हायला वेळ लागणार नाही, अशी भीती व्यक्त केली.

भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या मार्गदर्शनानुसार अहिल्यानगर येथे आयोजित भाजप जिल्हा कार्यकारिणी बैठक झाली. भाजपचे विधान परिषद सभापती प्रा. राम शिंदे, प्रदेश उपाध्यक्ष तथा माजी खासदार डॉ. सुजय विखे पाटील (Sujay Vikhe), आमदार राम सातपुते, जिल्हा प्रभारी भैरवी वाघ यांनी पदाधिकारी व कार्यकर्त्यांशी संवाद साधला.

या बैठकीला महापालिकेच्या नवनिर्वाचित 27 नगरसेवकांपैकी बहुतांश नगरसेवक बैठकीला गैरहजर होते. यावरून आमदार राम सातपुते यांनी भर व्यासपीठावरून नाराजी व्यक्त केली. भाजपच्या (BJP) चिन्हावर निवडून आलो आहोत, याचा विचार नगरसेवकांनी करायला हवा, असे सुनावत कार्यकर्ता चुकत राहिला, तर भाजप हा आम आदमी पार्टी व्हायला वेळ लागणार नाही, अशी भीती व्यक्त केली.

माजी खासदार विखे पाटील यांनी भाजपच्या कार्यकर्त्यांनी केवळ पक्षाच्या आदेशाची वाट न पाहता जनतेच्या प्रश्नांवर आणि सरकारच्या योजनांच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी स्वतःहून पुढाकार घेतला पाहिजे. पद मिळविण्यासाठी नव्हे, तर पक्षासाठी काम करण्याची मानसिकता प्रत्येक कार्यकर्त्याने ठेवली पाहिजे, असे सांगितले.

जिल्हा परिषदेची तयारी

अहिल्यानगर शहरातील भाजपच्या वाढत्या ताकदीकडे लक्ष वेधताना, महापालिकेत भाजपचे 25 नगरसेवक निवडून आल्याचा उल्लेख विखे पाटील यांनी केला. हीच ताकद आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये कायम ठेवण्यासाठी प्रत्येक पदाधिकारी व कार्यकर्त्याने पूर्ण क्षमतेने काम करण्याचे आवाहन केले. याच ताकदीने आपण लढत राहिलो तर जिल्हा परिषदेच्या 75 पैकी 60 जागा भाजपच्या येतील आणि अहिल्यानगर जिल्हा परिषद अध्यक्षपदही भाजपकडे येईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

नेत्यांमधील विरोधाभास चर्चेच्या केंद्रस्थानी

विखे पाटील भाजपच्या नगरसेवक वाढीचा आकडा सांगत असतानाच, बैठकीला गैरहजर असलेल्या नगरसेवकांवरून संताप व्यक्त केला. बैठकीमधील नेत्यांमधील हा विरोधाभास चर्चेच्या केंद्रस्थानी होता.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT