Raj Thackeray On PM Modi : ‘मोदींना भेटलं की भगवान भेटल्यासारखं वाटतं? मग भारतात परत या’; राज ठाकरेंचा टोला

Raj Thackeray targets PM Modi over foreign visits, GDP claims and Indians settling abroad : मोदींच्या परदेश दौऱ्यातील भारतीय वंशाच्या महिलांच्या प्रतिक्रियांचा संदर्भ देत राज ठाकरेंची टीका; 7.8% GDP दराच्या दाव्यावरही सवाल
Raj Thackeray MNS
Raj Thackeray MNSSarkarnama
Published on
Updated on

Raj Thackeray MNS rally : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज ठाण्यात संघटनेचा राज्यस्तरीय मेळावा घेतला. देशाच्या विकास दरावर भाष्य करताना, केंद्रातील भाजप मोदी सरकार आणि राज्यातील महायुती सरकारवर चौफेर आगपाखड केली.

तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या परदेश दौऱ्यात त्यांना भेटत असलेल्या महिला आणि महिलांनी दिलेल्या प्रतिक्रियेची नक्कल करत भाजपच्या परदेश धोरणावर प्रहार केला. राज ठाकरेंनी यानंतर पंतप्रधान मोदींच्या महिलांना फॅन यांना परदेशात राहाण्यापेक्षा भारतात राहायला या, असा उपरोधिक टोला लगावला.

राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी, आमचे पंतप्रधान परदेशात जातात, तेव्हा त्यांना तिथे भेटण्यासाठी बायका येतात, मोदीजी को मिला तो भगवान को मिला, एैसा लगा, अशा रडक्या चेहरा करून येतात, त्या महिला नाही का? असा प्रश्न करताच, एवढे जर वाटते आहे, तर देशात परत या, असा उपरोधिक टोला लगावला.

या देशात एवढं छान, सुरळीत सुरू आहे, 7.8 टक्के जेडीपी दर गेलेला आहे, इतर देशांपेक्षा जास्त झालेला आहे. मग राहाताय कशाला परदेशात? या इकडे, असे खुला आमंत्रण राज ठाकरेंनी दिले.

Raj Thackeray MNS
Mumbai Century Mill Land : सेंच्युरी मिलच्या जमिनीवरून काँग्रेस आक्रमक; ‘10 हजार कोटींचा फायदा कुणाला?’

देशाचा विकास दर सांगताना केंद्रातील भाजप (BJP) सरकारने 7.8 टक्के जीडीपी दर सांगितला आहे, याकडे लक्ष वेधताना, प्रत्यक्षात 2 पाॅइंट एवढा काहीतरी आहे, असा दावा राज ठाकरे यांनी केला.

Raj Thackeray MNS
Vidarbha Farmer Crisis : विदर्भात 24 तासांत पाच शेतकऱ्यांचे टोकाचे पाऊल; कर्जमुक्ती योजनेदरम्यानच्या घटनांमुळे सरकारची चिंता वाढली

देशातील मुले परदेशात शिकायला गेल्यावर तिथेच नोकरी करून स्थायिक होत आहेत, ही चिंता व्यक्त करताना, चीनमधील परिस्थिती वेगळी असल्याकडे त्यांनी लक्ष वेधले. तेथील मुले परदेशात शिकून पुन्हा देशात परत येत आहे. हे प्रमाण जवळपास 96 टक्क्यांच्या आसपास आहे, असेही राज ठाकरे यांनी सांगितले.

ब्रिटन दौऱ्यात महिला मोदींच्या भेटीनंतर भावूक

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जुलै 2025मधील लंडन (ब्रिटन) दौऱ्यादरम्यान एक भारतीय वंशाच्या महिलेची पंतप्रधान मोदींची भेट झाली होती. तेव्हा ती महिला खूप भावूक होत, डोळ्यात पाणी आणत, मोदींशी हस्तांदोलन केले.

महिलेची काय होती प्रतिक्रिया...

या भेटीवर, भारतात असताना मी कधी विचारही केला नव्हता की मला मोदीजींना भेटता येईल. या भेटीचा आनंद व्यक्त करताना, “I wouldn't have even imagined shaking his hand in India… this is so surreal,”, असे विधान करत, पंतप्रधान मोदींना आपला 'लिव्हिंग गॉड' (जिवंत देव) संबंधित महिलेने म्हटले होते.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com