Radhakrishna Vikhe On Ram Shinde Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Radhakrishna Vikhe On Ram Shinde : राम शिंदे सहमती एक्सप्रेसमध्ये का नाही? मंत्री विखेंनी अखेर मौन सोडले; जामखेड-कर्जतचे गणित उघड केले!

Why was Ram Shinde absent from Ahilyanagar DCC Bank election consensus? BJP Radhakrishna Vikhe Patil reveals Jamkhed-Karjat seat equation : अहिल्यानगर जिल्हा बँकेच्या निवडणुकीत विखे-थोरातांच्या एकजुटीमागचे राजकारण समोर; राम शिंदेंच्या नाराजीच्या चर्चांवर विखेंचे स्पष्टीकरण

Pradeep Pendhare

Ahilyanagar District Central Cooperative Bank : अहिल्यानगर जिल्हा बँकेच्या मतदानाच्या दिवशी भाजप विधान परिषदेचे सभापती प्रा. राम शिंदे बरोबर का येऊ शकले नाही, यावर भाजप मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी मोठा गौप्यस्फोट केला.

"राम शिंदे यांची जामखेडची जागा आपण बिनविरोध करण्यासाठी मदत केली. त्यांना कर्जतची जागा देखील बिनविरोध करू हवी होती. पण सगळ्याच गोष्टी आपल्या हातात नाही," असे मंत्री विखे पाटील यांनी स्पष्ट केले.

अहिल्यानगर जिल्हा बँकेच्या (DCC Bank) दहा जागांसाठी आज मतदान झाले. मतदानाच्या दिवशी प्रा. राम शिंदे मंत्री विखे पाटील-थोरात सहकार विकास सहमती एक्सप्रेसमध्ये सहभागी का होऊ शकले नाही, यावर मंत्री विखे पाटलांनी भाष्य केले. तसेच भाजप प्रदेश उपाध्यक्ष माजी खासदार सुजय विखे पाटील यांनी देखील बँकेच्या नावाबाबत मोठा दावा केला.

मंत्री विखे पाटील (Radhakrishna Vikhe Patil) म्हणाले, "बहुतांशी जागांवर एकमत झाले, पण काही ठिकाणी होऊ शकले नाही. लोकशाही आहे. प्रत्येकाला वाटते की संधी मिळावी, असे वाटते. जिल्हा बँक बिनविरोध व्हावी, यासाठी बाळासाहेब थोरातांपासून सुजयपर्यंत सर्वांनी मोट बांधली. या मागे संस्था टिकावी, जिल्हा बँक टिकावी, असा हेतू होता. पण काहींना संस्थेमध्ये गोंधळ घालायचा आहे. पण हा गोंधळ आम्ही दूर करणार आहोत."

'जिल्हा बँकेने कधी कोणाची जहागिरी मान्यच केली नाही. बँकेत कधीच जहागिरीचा नव्हती. तसा प्रश्नच येत नाही. त्यामुळे गोंधळी जे जमा झाले आहेत, त्यांचा लोक बंदोबस्त करतील,' असा टोला मंत्री विखे यांनी खासदार नीलेश लंके आणि त्यांच्या पॅनलला लगावला.

जिल्हा बँकेत विखे पाटील-थोरात सहमती एक्सप्रेसवर बोलताना, मंत्री विखे पाटील यांनी, 'सहकारात राजकारणाचे जोडे बाहेर ठेवावे लागतात. ही अनेक वर्षांची परंपरा आहे. पक्षीय राजकारणात वैचारिक मतभेद असले, तरी येथे सहकार टिकला पाहिजे. त्यातूनच आम्ही पुढे आलो आहोत,' असे स्पष्ट केले.

राम शिंदेंबाबात मंत्री विखे म्हणाले....

राम शिंदे मंत्री विखे पाटील-थोरात सहमती एक्सप्रेसमध्ये का येऊ शकले नाही, यावर बोलताना मंत्री विखे पाटील म्हणाले, "राम शिंदे यांची जामखेडमधील जागा बिनविरोधासाठी आपण मदत केली. ते कर्जतची देखील जागा बिनविरोध करून मागत होते. पण सगळ्यात गोष्टी आपल्या हातात नाही. तरी देखील राम शिंदे यांचे आम्हाला सहकार्य लाभले आहे, त्यात काही संदिग्धता नाही."

पारनेर जागेच्या विजयाबाबत विखेंचा मोठा दावा

जिल्हा बँकेत संचालक मंडळ येताच, पहिला ठराव हा जिल्हा बँकेचे नावाचा होईल. अहमदनगर ऐवजी अहिल्यानगर जिल्हा सहकारी बँके असे नाव केले जाईल, असे माजी खासदार सुजय विखे पाटील यांनी म्हटले. पारनेरची जागा आम्हालाच मिळेल, अशी इच्छा आणि अपेक्षा आहे. पण मतदार जो कौल देतील तो मान्य राहील. राम शिंदेंबाबत समन्वयासाठी उशिर झाला, असे विखे पाटील यांनी म्हटले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT