Ramdas Athawale Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Ramdas Athawale : रामदास आठवलेंनी सरकारची डोकेदुखी वाढवली; पुतळा कोसळण्याचं कारण सांगितलं

Ramdas Athawale told the reason for the collapse of Chhatrapati Shivaji Maharaj statue : छत्रपती शिवाजी महाराज यांचा मालवण इथं कोसळलेल्या पुतळ्यामागील कारण केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी सांगितले.

Pradeep Pendhare

Ahmednagar News : छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा मालवणमध्ये कोसळण्याचे कारण केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी राज्य सरकारची चांगलीच डोकेदुखी वाढवली.

"चुकीच्या माणसाला पुतळा तयार करण्याचे दिलेले काम आणि चुकीपद्धतीने पुतळा उभारण्यात आला, हे पुतळा कोसळण्याचे मुख्य कारण आहे", असे सांगून रामदास आठवले यांनी राज्य सरकारला आरोपीच्या पिंजऱ्यात उभे केले.

मंत्री रामदास आठवले संविधान सन्मान महामेळाव्यासाठी नगरमध्ये होते. मेळाव्यापूर्वी त्यांनी माध्यमांच्या प्रतिनिधींशी संवाद साधला. छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा कोसळण्याच्या घटनेवर त्यांनी राज्य सरकारला आरोपीच्या पिंजऱ्यात उभे केले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांची यासंदर्भात आपण भेट घेणार आहोत. पुतळा बसविण्यासाठी खास समिती स्थापन करून त्यात सत्ताधाऱ्यासह विरोधक आणि पुतळा उभारणीपासून ते बसवण्यापर्यंतच्या जाणकाराचा समावेश करावा, अशी मागणी करणार असल्याचे रामदास आठवले यांनी सांगितले.

"मालवणमध्ये चक्रीवादळ नव्हते, जोराच्या वाऱ्याने छत्रपतींचा पुतळा कोसळला. कारण तो चुकीच्या पद्धतीने बसवला होता. हे काम चुकीच्या माणसाला दिले होते. हेच मुख्य कारण आहे, पुतळा कोसळण्याचे", असे रामदास आठवले यांनी सांगितले. विधानसभा निवडणुकीच्या तयारीवर देखील मंत्री रामदास आठवले (Ramdas Athawale) यांनी भाष्य केले.

विधानसभेत तडजोड करणार नाही

लोकसभा निवडणुकीत महायुतीत एकही जागा मिळाली नाही. परंतु आता विधानसभा निवडणुकीत राज्यात रिपाई 11 ते 12 जागा महायुतीकडे मागितल्या आहेत. आता अन्याय सहन करणार नाही. कार्यकर्त्यांच्या भावना देखील तीव्र आहेत. त्यामुळे महायुतीत जागांबाबत कुठलीही तडजोड करणार नाही, अशी भूमिका रामदास आठवले यांनी मांडली.

अपप्रचाराने महायुतीची डोकेदुखी वाढवली

लोकसभा निवडणुकीत संविधानबाबत अपप्रचार करण्यात विरोधकांना यश आले. त्यामुळे महाराष्ट्र, उत्तरप्रदेश, राजस्थान या राज्यात ‘एनडीए’ला फटका बसला. संविधान बदलण्याचा कोणताही विचार मोदी सरकारचा नव्हता. हातात पुस्तके घेऊन विरोधकांनी मोदी सरकार पुन्हा आले, तर संधिवान बदलणार, आरक्षण जाणार, असा प्रचार केला. आता विधानसभा निवडणुकीला देखील संविधानाच्या मुद्यावर विरोधकांचा फोकस असणार आहे. त्यामुळे विरोधकांना रोखण्यासाठी महायुतीत रिपाईला विश्वासात घ्यावेच लागेल, असेही मंत्री रामदास आठवले यांनी म्हटले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT