Ramdas Athawale News
Ramdas Athawale News Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Ramdas Athawale News : 'वकिलांच्या संरक्षणासाठी' आता मंत्री आठवले सरसावले; मुख्यमंत्री-कायदामंत्र्यांना लिहिणार पत्र!

Pradeep Pendhare

Ahmednagar News : नगर जिल्ह्यातील राहुरी येथे राजाराम आढाव आणि त्यांची पत्नी मनीषा या वकील दाम्पत्याची अपहरण करून हत्या झाली. यानंतर राज्यात वकिलांमध्ये एक संतप्त लाट उसळली. नगर जिल्ह्यासह राज्यात वकील संघटनांनी संरक्षण कायदा लागू करण्याची मागणी लावून धरली. आता या मागणीसाठी नगरमधील वकिलांनी केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांची भेट घेतली आहे. या कायद्यासाठी राज्याचे मुख्यमंत्री आणि कायदामंत्री यांना पत्र लिहिणार असल्याचे मंत्री आठवले यांनी सांगितले. (Latest Marathi News)

नगर शहर बार असोसिएशनच्या शिष्टमंडळाने दिल्ली येथे केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांची भेट घेतली. महाराष्ट्रात वकील संरक्षण कायदा लागू होण्यासाठी पाठपुरावा करण्याची मागणी केली. या वेळी ॲड. महेश शिंदे, सुहासराव सोनवणे, पोपटराव बनकर, रावसाहेब मगर, बाबू काकडे आदी उपस्थित होते. वकील शिष्टमंडळाने राहुरीमध्ये आढाव वकील दाम्पत्याची झालेल्या हत्येचा घटनाक्रम सांगितला. मंत्री आठवले यांनी हत्येचा निषेध केला.

नगर शहर बार असोसिएशनचे ॲड. महेश शिंदे यांनी कर्नाटक, राजस्थान राज्यात वकील संरक्षण कायदा लागू आहे, याकडे मंत्री आठवले (Ramdas Athawale) यांचे लक्ष वेधले. महाराष्ट्रात या कायद्याच्या मागणीसाठी गेल्या काही वर्षांपासून संघर्ष सुरू आहे. यातच वकिलावर हल्ले, खून, खंडणी, धमकी, मारहाण असे गंभीर स्वरूपाचे प्रकार सातत्याने घडत असल्याकडे मंत्री आठवले यांचे वकील शिंदे यांच्या शिष्टमंडळाने लक्ष वेधले. राज्य सरकारने आचारसंहितेपूर्वी वकील संरक्षण कायदा लागू करावा, अशी मागणी त्यांनी केली.

न्याय प्रक्रियेत वकील सर्वात महत्त्वाचा घटक आहे. दोन्ही बाजूने वकील सेतूचे काम करत असतो. यातून काही ठिकाणी वकिलांविरुद्धच रोष तयार होतो. यातून त्यांच्यावर हल्ल्याच्या घटना वाढल्या आहेत. याबाबत राज्य सरकारकडे वकील संरक्षणाची जी मागणी करत आहेत, ती रास्त आहे. राज्यात वकील संरक्षण कायदा लागू व्हावा, यासाठी मुख्यमंत्री आणि कायदेमंत्री यांना पत्रव्यवहार करणार असल्याचे आश्वासन मंत्री रामदास आठवले यांनी नगर (Ahmednagar Politics) शहर बार असोसिएशनच्या शिष्टमंडळाला दिले.

(Edited By - Chetan Zadpe)

R

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT