Solapur News : सोलापुरात भाजपला उमेदवार मिळत नाही. पण, भाजप एखादा छुपा रुस्तम उमेदवार काढतील. मागील 2019 च्या लोकसभा निवडणुकीवेळी भाजपने असाच एक उमेदवार काढला, त्याच्याकडे जातीचे प्रमाणपत्र नव्हते. ते प्रकरण आता कोर्टात चालू आहे. मात्र ते उमेदवारी बाबतीत कुणाचं काय काढतील, हे सांगता येत नाही, असा टोला काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सुशीलकुमार शिंदे यांनी भाजपला लगावला.
सुशीलकुमार शिंदे (Sushilkumar Shinde) म्हणाले, आमदार प्रणिती शिंदे यांना उमेदवारी मिळावी, अशी सोलापूर (Solapur) काँग्रेसच्या सदस्यांची इच्छा आहे. उमेदवारीबाबत हायकमांड निर्णय घेईल, तो आम्हाला मान्य असेल. काँग्रेसचा कोणीही उमेदवार असला तरी त्यासाठी जिल्हा काँग्रेसकडून तयारी केली जात आहे. आमच्या जिल्हाध्यक्षांची अडचण असल्यामुळे सध्या प्रभारी जिल्हाध्यक्ष नेमले आहेत. जिल्ह्यात काँग्रेस पक्षाला (Congress) ज्या ज्या ठिकाणी अडचण आहे. त्या त्या ठिकाणी डागडुजीचे काम सुरू आहे.
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
वंचित बहुजन आघाडीचे प्रकाश आंबेडकर हे महाविकास आघाडीसोबत येतील. मागील निवडणुकीत त्यांना अनुभवाचे चटके बसले आहेत. यातून ते सुधारतील, अशी माझी कल्पना आहे. वेगळा असं काही होणार नाही. लोकांनी आता ठरवलं पाहिजे.. वंचितबाबत मागच्या निवडणुकीत आलेला अनुभव, नागरिकांनी त्यातून मतदान केलं पाहिजे, अशी अपेक्षा सुशीलकुमार शिंदे यांनी व्यक्त केली.
रोहित पवार यांच्या ईडी चौकशीबाबत सुशीलकुमार शिंदे म्हणाले, निवडणुका जवळ आल्या की, अशा प्रकारचे कृत्य हे काय चांगलं नाही. फ्री आणि फेअर निवडणुका झाल्या पाहिजेत, अशा प्रकारची आमची भूमिका आहे. आमदार नीलेश लंके यांच्या शरद पवार गटातील प्रवेशाबाबत त्यांनाच विचारावे. आमच्याकडे प्रामाणिकपणे काम करणाऱ्या कार्यकर्त्यांना आम्ही संधी देतो. बाकीच्यांना नाही..
निवडणूक आयुक्त राजीनाम्याचे काय कारण आहे. ते माहिती नाही. पण, राजीनामा देणे याच्या पाठीमागे संशयास्पद भूमिका आहे, असे वाटते. बघूया राजीनाम्याबाबत काहीतरी बाहेर येईलच, याची वाट पाहूया, असेही शिंदे म्हणाले.
येत्या तीन-चार दिवसांत महाविकास आघाडीचे लोकसभेचे उमेदवार झाले पाहिजेत, असं मला वाटतं. महाविकास आघाडीच्या उमेदवारीच्या यादीत वंचित बहुजन आघाडीही असली पाहिजे, असेही ते म्हणाले.
Edited By : Vijay Dudhale
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.