RPI leader Ramdas Athawale  Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Ramdas Athawale : जवळच्या माणसावर मोक्का, रामदास आठवले म्हणाले 'नाशिक पोलिसांनी अन्याय केला' ; दिली मोठी कबुली..

Ramdas Athawale On Prakash Londhe प्रकाश लोंढे हे रामदास आठवले यांचे निकटवर्ती व आरपीआय जिल्हाध्यक्ष होते. नाशिक पोलिसांनी संघटित गुन्हेगारी प्रकरणात त्यांच्यावर मोक्का लावला असून ते सध्या नाशिक सेंट्रल जेलमध्ये आहेत.

Ganesh Sonawane

Nashik Politics : खंडणी व सातपूर गोळीबार प्रकरणात आरपीआय जिल्हाध्यक्ष व माजी नगरसेवक प्रकाश लोंढे सध्या नाशिक कारागृहात आहे. त्यांची दोन्ही मुले देखील कारागृहात आहेत. संघटित गुन्हेगारी प्रकरणात प्रकाश लोंढे यांच्यासह त्यांची दोन मुलं व टोळीवर नाशिक पोलिसांनी मोक्का अंतर्गत कारवाई केली आहे.

याप्रकरणी इतके दिवस रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे अध्यक्ष व केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी माध्यमांसमोर येऊन उघडपणे कोणतेही भाष्य केलं नव्हतं. मात्र बुधवारी नाशिक दौऱ्यावर आलेल्या मंत्री आठवले यांनी याप्रकरणावर प्रतिक्रिया दिली.

केंद्रीय मंत्री आठवले म्हणाले, प्रकाश लोंढे आज याठिकाणी नाही, याची खंत आहे. त्यांच्यावर पोलिसांनी अन्याय केला आहे. पोलिसांनी त्यांच्यावर मोक्का लावायला नको होता. लोंढेला वाचविण्यासाठी मी प्रयत्न केले, पण ते अपूर्ण पडल्याची कबुली त्यांनी दिली.

मंत्री आठवले पुढे म्हणाले, प्रकाश लोंढे हा पक्षाचा अॅक्टिव कार्यकर्ता होता. एवढ्या वर्षात त्यांच्याबद्दल माझ्या कानावर एकही तक्रार आलेली नाही. प्रकाशने कुणाला फसवल्याची किंवा काही केल्याची कुणीही कधी तक्रार केली नाही. त्याची मुलं थोडी गडबड करणारी होती. पण प्रकाश लोंढेवर अन्याय झाला आहे असं मला वाटतं. त्यामुळे प्रकाशवर मोक्का लावायला नको होता. त्याच्या मुलाने थोडा व्हायात पणा केल्याने ते प्रकाशच्या अंगलट आल्याचं आवठले म्हणाले.

नाशिकच्या सातपूर येथे एका बारमध्ये झालेल्या गोळीबार प्रकरणात आठवले यांचे निकटवर्तीय असलेल्या प्रकाश लोंढे यांनाही पोलिसांनी ताब्यात घेतलं होतं. त्यांची दोन्ही मुले भूषण आणि दीपक लोंढे या दोघांनाही आरोपी करण्यात आले. गोळीबार प्रकरणाव्यतिरिक्त खंडणीचे गुन्हेही त्यांच्यावर दाखल करण्यात आले. शिवाय लोंढे यांच्या कार्यालयात पोलिसांनी झडती घेतली असता त्यात भुयार आढळलं. या भुयाराचा वापर गुन्हेगारीसाठी करण्यात आल्याचं समोर आलं होतं.

इतके सगळे घडूनही रामदास आठवले यांनी पक्षाच्या वतीने या प्रकरणावर आपली जाहीर भूमिका स्पष्ट केले नव्हती. त्यामुळे पक्षाने त्यांना वाऱ्यावर सोडल्याच्या बोललं गेलं. मात्र नाशिक येथे बोलताना आपण लोंढेला वाचविण्यासाठी प्रयत्न केले होते मात्र त्यात यश आलं नाही अशी कबुली आठवले यांनी दिली. लोंढे यांच्या मुलांवर कारवाई झाली ती ठिक आहे. मात्र स्वत: प्रकाश लोंढे यांच्यावर मोक्का लावायला नको होता असा पुनरुच्चार आठवले यांनी केला. दरम्यान, गंभीर गुन्हे दाखल असूनही आठवले यांनी अशाप्रकारे प्रकाश लोंढे यांची पाठराखण केल्याने हे अपेक्षित नसल्याच्या भावना व्यक्त होत आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT