Nashik Prakash Londhe : लोढेंच्या अडचणीत पक्षही सोबत नाही, मंत्री आठवलेही चार हात लांब ..?

Ramdas Athawale Maintains Distance from Londhe’s Controversy : प्रकाश लोंढे हे केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांचे निकटवर्तीय मानले जातात. याशिवाय प्रकाश लोंढे हे आरपीआयचे जिल्हाध्यक्ष आहेत.
Nashik Prakash Londhe ,Ramdas Athawale
Nashik Prakash Londhe, Ramdas AthawaleSarkarnama
Published on
Updated on

Nashik news : नाशिकच्या सातपूर येथे एका बारमध्ये झालेल्या गोळीबार प्रकरणात आरपीआयचे नेते व केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांचे निकटवर्तीय माजी नगरसेवक प्रकाश लोंढे यांचा पाय आणखी खोलात गेला आहे. अशात या प्रकरणापासून मंत्री आठवले व पक्षाने चार हात लांब राहण्याचीच भूमिका घेतल्याचे दिसत आहे.

या गोळीबार प्रकरणात प्रकाश लोंढेसह त्यांची दोन्ही मुले भूषण आणि दीपक लोंढे या दोघांनाही आरोपी करण्यात आले आहे. प्रकाश लोंढेसह दीपक लोंढे पोलिस कोठडीत असून भूषण हा फरार आहे. दरम्यान लोंढेच्या अडचणी अधिक वाढण्याचे कारण म्हणजे या गोळीबाराव्यतिरिक्त सातपूर येथील अपहरण प्रकरण व अंबड परिसरातील बंगला बेकायदेशीरपणे बळकावल्याप्रकरणी लोंढे यांच्यावर खंडणीचे गुन्हेही दाखल करण्यात आले आहेत.

शिवाय लोंढे यांच्या कार्यालयात पोलिसांनी झडती घेतली असता त्यात भुयार आढळलं. या भुयाराचा वापर गुन्हेगारीसाठी करण्यात आल्याचं समोर आलं आहे. या भुयारात कुऱ्हाड, कांबी, चाकू अशी घातक हत्यारे सापडली आहेत. महागड्या विदेशी मद्याच्या बाटल्याही पोलिसांनी जप्त केल्या आहेत. त्यामुळे लोंढेच्या अडचणीत आणखी भर पडली आहे.

Nashik Prakash Londhe ,Ramdas Athawale
Sinnar Politics : वाजे-कोकाटे एकत्र आल्यास आणखी वाढणार डोकेदुखी, इच्छुकांच्या नाराजीचा करावा लागणार सामना

परंतु इतके सगळे घडूनही अद्याप यावर रामदास आठवले यांनी पक्षाच्या वतीने या प्रकरणावर आपली जाहीर भूमिका स्पष्ट केलेली नाही. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार या प्रकरणापासून आठवले यांनी चार हात लांब राहण्याची भूमिका घेतल्याचे समजते. त्यामुळे अडचणीत पक्षही सोबत नसल्याने लोंढे यांच्या अडचणीच भर पडण्याची शक्यता आहे.

या प्रकरणात सुरुवातीला लोंढे हे आठवले यांचे निकटवर्तीय मानले जात असल्याने त्यांच्या बचावासाठी आठवले काही हालचाल करतील असे बोलले जात होते. परंतु सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार लोंढेवर एकामागोमाग एक गंभीर गुन्हे दाखल होऊ लागल्याने मंत्री आठवलेंनी हात आखडता घेतला. लोंढेंना ज्यावेळी अटक झाली तेव्हा त्यांच्या समर्थकांनी मंत्री आठवलेंशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. यावेळी मंत्री आठवलेंनी भूषण लोंढेविरोधातील जुन्या तक्रारींची कबुली दिली. मात्र, प्रकाश लोंढेंविरोधातील खंडणीसंबंधीच्या गुन्ह्यांवर त्यांनी तोंडावर बोट व कानावर हात ठेवल्याचे समजते. (Nashik News)

Nashik Prakash Londhe ,Ramdas Athawale
Nashik Prakash Londhe : चावी फिरवताच उघडला गुप्त दरवाजा, लोंढेच्या कार्यालयातील भुयारात काय काय सापडलं?

काय आहे प्रकरण ?

सातपूरच्या आयटीआय सिग्नलजवळील 'औरा बार'मध्ये काही तरुणांमध्ये झालेला वाद मिटवणाऱ्या 'बाउन्सर्स" ला धक्काबुक्की झाल्यानंतर उद्भवलेल्या राड्यातून ५ ऑक्टोबर रोजी पहाटे २ वाजता हा गोळीबार झाला होता. या घटनेत गोळी लागल्याने एक ग्राहक गंभीर जखमी झाला. यात प्रकाश लोंढे यांचा मुलगा भूषण लोंढे व त्याच्या साथीदारांचा सहभाग असल्याचे उघडकीस आले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com