Ramdas Athawale Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Maharashtra Politics: कार्यकर्त्यांचा प्रचंड उत्साह, हजारोंची गर्दी, तरी केंद्रीय मंत्र्यांनी चकार शब्दही न काढता गुंडाळला दौरा ; काय घडलं..?

Ramdas Athawale tour news : पंतप्रधान मोदी यांच्या आवाहनामुळे अनेक मंत्री आपल्या दौऱ्यात गाड्यांचा ताफा मर्यादित ठेवू लागले आहेत. असाच प्रयत्न राज्यमंत्री आठवले नाशिक आणि मालेगाव दौऱ्यात केला. मात्र उत्साही कार्यकर्त्यांमुळे तो स्टडीस गेला नाही.

Sampat Devgire

RPI News: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाची आटती परकीय गंगाजळी आणि आर्थिक अडचणीमुळे काटकसरीचे आवाहन केले. या आवाहनानंतर राज्यमंत्री रामदास आठवले यांनी शिर्डी आणि नाशिकचा दौरा केला. त्यांचा हा दौरा चर्चेत आहे.

रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे नेते आणि केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले आपल्या चारोळ्या आणि शीघ्र कवितांमुळे चर्चेत असतात. नाशिकच्या दौऱ्यात मात्र त्यांनी देवळालीच्या कार्यकर्त्यांना याबाबत निराश केले. मोठी गर्दी असूनही न बोलताच त्यांनी निरोप घेतला.

पंतप्रधान मोदी यांच्या आवाहनामुळे अनेक मंत्री आपल्या दौऱ्यात गाड्यांचा ताफा मर्यादित ठेवू लागले आहेत. असाच प्रयत्न राज्यमंत्री आठवले नाशिक आणि मालेगाव दौऱ्यात केला. मात्र उत्साही कार्यकर्त्यांमुळे तो स्टडीस गेला नाही.

रामदास आठवले आणि विलंब हे एक सूत्र आहे. प्रदीर्घ प्रतीक्षेनंतर त्यांनी नाशिक आणि मालेगावचा दौरा केला. त्यामुळे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी अनेक ठिकाणी त्यांचे स्वागत केले. आठवले यांनीही लहान-लहान कार्यक्रमात नाही हजेरी लावली.

मालेगाव येथे आल्यावर कार्यकर्त्यांनी त्यांचे जोरदार स्वागत केले. त्यांच्या या दौऱ्यात चार ठिकाणी कार्यक्रम होते. लांब अंतरावरील गावांत कार्यक्रम असल्याने आठवलेंचा मोठा वेळ त्यात खर्ची पडला.

शिर्डीहून मालेगावला आलेले आठवले रस्त्यात निफाड आणि खेरवाडी येथील कार्यक्रमांनाही उपस्थित राहिले. शहरात आल्यावर सातपूर येथील कार्यक्रमांना हजेरी लावून ते देवळाली कॅम्प येथे पोहोचले.

राज्यमंत्री आठवले देवळाली कॅम्प येथे पोहोचले, तेव्हा मध्यरात्र झाली होती. बारा वाजण्यास अवघे दहा मिनिटे शिल्लक असताना त्यांचे व्यासपीठावर आगमन झाले. यावेळी परिसरातील शेकडो कार्यकर्ते आणि नागरिकांनी गर्दी केली होती. सत्काराचा कार्यक्रम आटोपता घेऊनही रात्रीचे बारा वाजले.

शासकीय आचारसंहिता आणि पोलिसांच्या सूचना यामुळे मंत्री सार्वजनिक कार्यक्रमात रात्री बारानंतर भाषण करीत नाहीत. देवळाली कॅम्प येथे कार्यक्रमात हीच द्विधा स्थिती निर्माण झाली. राज्यमंत्री आठवले यांनी मात्र यावेळी नियमांचे पालन केले. कार्यकर्त्यांचा उत्साह, नागरिकांची गर्दी असूनही मध्य रात्र झाल्याने त्यांनी कार्यकर्त्यांची क्षमा मागत भाषण न करताच कार्यक्रम स्थळ सोडले. त्यामुळे त्यांचा हा दौरा वेगळ्याच कारणाने चर्चेत राहिला.

मंत्रिपदाची नाही हाव...

मालेगाव येथे राज्यमंत्री आठवले यांनी काही वेळ पत्रकारांची संवाद साधला. यावेळी त्यांनी पंतप्रधान मोदी हे देशाची आर्थिक स्थिती आणि हितासाठी काटकसरीचे आवाहन करीत आहे, असे सांगितले. यावेळी त्यांनी शिघ्र कविता केलीच, मी राजकारणात आलो, मात्र मला नाही मंत्रिपदाची हाव, मी येथे आलो, ते शहर आहे मालेगाव! असं म्हणत त्यांनी आपल्या खास शैलीची झलक दाखवली.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT