Rayat Sena agitation at Chalisgaon Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

अनोखे आंदोलन...पुलाच्या मागणीसाठी रयत सेना उतरली नदीपात्रात!

पाटणादेवी येथे रयत सेनेचे अध्यक्ष गणेश पवार यांच्यासह आंदोलन करताना आंदोलन करताना पदाधिकारी.

Sampat Devgire

चाळीसगाव : पाटणादेवी (Jalgaon) येथे नवरात्रोत्सवानिमित्त चंडिकादेवीच्या दर्शनासाठी आलेल्या भाविकांना (Devotee) पुलाअभावी डोंगरी नदीच्या पाण्यातून जीव धोक्यात घालून प्रवास करावा लागत आहे. त्यामुळे तत्काळ पूल उभारण्यात यावा, यासाठी रयत सेनेतर्फे (Rayat Sena) बुधवारी डोंगरी नदीच्या पाण्यात उभे राहून आंदोलन करण्यात आले. या अनोख्या आंदोलनाची प्रशासन दखल घेणार काय याची उत्सुकता आहे. (Rayat Sena deemands bridge at Patanadevi in Jalgaon)

साडेतीन शक्तिपीठांपैकी एक असलेल्या पाटणादेवी येथे शारदीय नवरात्रोत्सवानिमित्त चंडिकादेवीची यात्रा भरली आहे. या यात्रेला राज्यातील कानाकोपऱ्यातून हजारोंच्या संख्येने भाविकांची गर्दी पाहायला मिळत आहे. बुधवारी कमालीचा उकाडा जाणवत असतानाही भाविकांची गर्दी अधिक प्रमाणात झाली. परंतु पुलाअभावी येथे आलेल्यांची गैरसोय होत आहे.

येथे तत्काळ पूल उभारावा, यासाठी रयत सेना आक्रमक झाली असून, बुधवारी (ता.५) डोंगरी नदीच्या पाण्यात उभे राहून आंदोलन करीत सर्वांचे लक्ष वेधले.

आंदोलनात रयत सेना संस्थापक अध्यक्ष गणेश पवार, प्रदेश संघटक संतोष निकुंभ (संता पहिलवान), जिल्हाध्यक्ष संजय कापसे, जिल्हा उपाध्यक्ष स्वप्नील गायकवाड, दत्तू पवार, विशाल सपकाळ, वैद्यकीय तालुकाध्यक्ष पंकज पाटील, तालुका उपाध्यक्ष भरत नवले, मुकुंद पवार, शहराध्यक्ष छोटू अहिरे, संघटक दीपक देशमुख, सुधीर शिंदे, बबलू जगताप, कृष्णा गायकवाड, सचिन गायकवाड, राकेश निकम, गोपाल पाटील, पाटणा गावाचे दीपक पाटील, सोनू कदम, आबा देसले, समाधान राजगिरे, विलास सोनवणे, बुरान सय्यद, आनंदराव शेळके, आकाश चौधरी, तानाजी सोनवणे, उमेश काळे यांच्यासह पाटणा गावातील ग्रामस्थ सहभागी झाले होते.

---

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT