Shivsena: भाषण एकच...उद्धव ठाकरेंचे; बाकी सगळं फेकनाथ!

शिवसेनेचे संपर्क प्रमुख भाऊसाहेब चौधरी यांनी शिंदे गटाच्या मेळाव्यावर टिका.
Bhausaheb Choudhary
Bhausaheb ChoudharySarkarnama

नाशिक : दसरा मेळावा (Dasara Melava) ही शिवसेनाप्रमुख (Shivsena Suprimo) बाळासाहेब ठाकरे (Balasaheb Thackray) यांनी सुरु केलेली हिदुत्वाच्या (Hindutwa) विचारांचे सोने लुटण्याची परंपरा आहे. त्या परंपरेला उंचीवर नेणारे भाषण काल पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackray) यांनी केले. इतर सगळ्यांनी काहीही आव आणला तरी शेवटी ते फेकनाथच ठरले, असे जिल्हा संपर्कप्रमुख भाऊसाहेब चौधरी (Bhausaheb Choudhary) यांनी सांगितले. (Shivsena dasara rally success as excepected in Mumbai)

Bhausaheb Choudhary
Shivsena: शिवसेनेच्या महिलांनी शिंदे समर्थकांना थेट चोपलेच!

शिवसेनेचा दसरा मेळावा काल झाला. त्यासाठी नाशिकहून असंख्य कार्यकर्ते व महिला स्वयंस्फूर्तीने मेळाव्याला गेल्या होत्या. नाशिकच नव्हे तर कालच्या मेळाव्याला राज्याच्या कानाकोपऱ्यातील शिवसेनेच्या कार्यकर्ते, नेत्यांनी पाठबळ दिले होते. विशेष म्हणजे शिवतीर्थावर जागा शिल्लक राहिली नव्हती. शिवतीर्थाच्या परिसरात हजारो कार्यकर्ते कान देऊन उद्धव ठाकरे यांचे भाषण ऐकत होते.

Bhausaheb Choudhary
Prataprao Jadhav : शिंदे गटातील खासदारावर मोदींनी सोपवली मोठी जबाबदारी

ते म्हणाले, भाषण एकच झाले. उद्धव ठाकरे याचं. बाकी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे तर भाषण वाचून दाखवत होते. त्यांना ते कोणी लिहून दिले होते, हे सांगण्याची गरज नाही. कारण बंडखोर व त्यांच्या मागे असलेल्या शक्ती यांचा खरा बोलविता धनी कोण हे सबंध महाराष्ट्राला माहित आहे.

दसरा मेळाव्याबाबत सरळ सरळ फरक दिसला. उद्धव ठाकरे यांनी एकही शब्द वाचून दाखवला नाही. डायरेक्ट मनापासून ते बोलत होते. त्यात शिवसेनेच्या कार्यकर्त्याविषयीची तळमळ होती. त्यादृष्टीने तो एकनीष्ठ मेळावा यशस्वी झाला. कारण विविध वाहीन्यांवर येणाऱ्या बातम्यांत सांगितले जात होते, त्यानुसाप बीकेसीच्या सभेला येणाऱ्यांना पैसे, जेवणाचे आमिष, गाड्या यातून कोणीही लोकं शिवसेनेने नेले नव्हते, हेच एकनीष्ठ दसरा मेळाव्याचे यश. ते दिर्घकाळ टिकेल. लोकांच्या मनात राहील. बाकी इतरांचे भवितव्य कालच दिसून आले

...

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com