Suresh Khade
Suresh Khade Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Jalgaon Politics; बैठक रद्द झाल्याने कामगार मंत्र्यांच्या भूमिकेबाबत संशय

Sampat Devgire

जळगाव : (Jalgaon) रेमंडमधील कामगार संघटना (Raymond Mill Issue) व व्यवस्थापनाच्या वादावर तोडगा काढण्यासाठी शुक्रवारी कामगारमंत्र्यांच्या (Labour Minister) दालनात आयोजित बैठक ऐनवेळी रद्द करण्यात आली. यासंदर्भात विधानपरिषदेत एकनाथ खडसे (Eknath Khadse) यांनी लक्षवेधी सुचनेद्वारे हा प्रश्न उपस्थित केला होता. (Raymond mill labour agrrement issue meeting canceled)

कंपनीने कामगारांना कामावर हजर होण्याबाबत अल्टिमेटम दिल्यानंतर बहुतांश कामगार कामावर हजर झाले. मात्र, कामगारहितासाठी आयोजित बैठक ऐनवेळी रद्द केल्याने यात राजकारण झाल्याचे बोलले जात आहे.

गेल्या आठवड्यापासून रेमंडमधील कामगारांचे वेतन करारावरून कामबंद आंदोलन सुरू केले आहे. त्यातून कामगार संघटनांमधील वादही समोर आला. त्यामुळे कंपनी परिसरात तणाव निर्माण होऊन कलम १४४ लागू करण्यात आले.

माजी महापौर तथा कामगारनेता ललित कोल्हे यांच्यावर गुन्हाही दाखल झाला. हा विषय थेट विधिमंडळात गाजला. विधान परिषद सदस्य एकनाथ खडसे यांनी लक्षवेधी मांडत मुद्दा उपस्थित केला. त्यावर कामगारमंत्री सुरेश खाडे यांनी शुक्रवारी दुपारी दोनला त्यांच्या दालनात बैठक घेण्याची सूचना केली.

त्यानुसार बैठकीचा अजेंडा निश्चित झाला. बैठकीस पालकमंत्री गुलाबराव पाटील, ग्रामविकासमंत्री गिरीश महाजन, आमदार खडसे यांच्यासह कामगार उत्कर्ष सभा, खानदेश कामगार उत्कर्ष संघटनेच्या पदाधिकाऱ्यांना बोलाविण्यात आले.

कामगार प्रतिनिधी मुंबईत हजर झाले होते, पण ऐनवेळी ही नियोजित बैठक रद्द करण्यात आली. त्यामुळे कामगारहिताच्या निर्णयाचे काय? यासह बैठक रद्द करण्यामागे काही राजकारण तर झाले नाही ना, असे प्रश्न निर्माण झाले आहेत.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT