Pravin (Bunty) Tidme
Pravin (Bunty) Tidme Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Shivsena: शिंदे गटात गेलेल्या तिदमेंची परतण्याआधीच हाकालपट्टी!

Sampat Devgire

सिडको : माजी नगरसेवक प्रविण तिदमे (Pravin Tidme) शिंदे गटात (Eknath Shinde) प्रवेश केला. लगोलग त्यांची महानगरप्रमुखपदी नियुक्ती झाली. मात्र ते नाशिकला (Nashik) परतण्याआधीच त्यांची म्युनिसिपल कर्मचारी कामगार सेनेच्या अध्यक्षपदावरून हकालपट्टी (extrusion) झाली. संघटनेचे संस्थापक अध्यक्ष व माजी मंत्री बबन घोलप (Baban Gholap) यांनी यासंदर्भात पत्रक काढले. (Bunty tidme remove from the post of Municiple corporationnsena)

शिवसेनेचे माजी नगरसेवक प्रवीण (बंटी) तिदमे यांनी शिंदे गटात प्रवेश केला. त्या गटाचे महानगरप्रमुख पदाची जबाबदारी त्यांना देण्यात आली. सिडको म्हणजे शिवसेना हे जुने समीकरण आहे. सिडको हा शिवसेनेचा बालेकिल्ला असल्याने शिवसेनेचे पदाधिकारी अस्वस्थ झाले आहेत. या राजकीय हालचालींत शिवसेनेच्या सिडको गडाला पहिला हादरा बसल्याचे मानले जात आहे. काल दिवसभर त्याची जोरदार चर्चा होती.

सध्या तिदमे वगळता सेनेचे महानगरप्रमुख सुधाकर बडगुजर यांच्या पत्नी हर्षा बडगुजर, रत्नमाला राणे, कल्पना चुंभळे, किरण गामने, सुदाम डेमसे, संगीता जाधव, दीपक दातीर, डी. जी. सूर्यवंशी, सुवर्णा मटाले, श्याम साबळे, चंद्रकांत खाडे आणि दिवंगत कल्पना पांडे असे नगरसेवक आहेत. जाणकारांच्या मते शिवसेनेच्या धनुष्यबाण चिन्हाचा फैसला झाल्यानंतर सिडकोच्या या गडात अजून मोठी पडझड होणार आहे.

दुसरीकडे सेनेच्या निष्ठावंत गटाने मात्र पुढची सोईस्कर ऍडजेस्टमेंट आणि कदाचित तिकिटासाठी स्पर्धेचा विचार करून तिदमे यांनी हा निर्णय घेतला असल्याचा दावा केला आहे. मनपा निवडणुकीतील सुरवातीच्या निसटत्या पराभवानंतर त्यांनी सर्वात जास्त मताधिक्याने निवडून येण्याचा गतवेळी पराक्रम केला आहे. शिवाजी चौक आणि लगतचा गोविंदनगर भाग अशा प्रभागातून ते इच्छुक आहेत.

माजी मगरसेवक शिवाजी चुंभळे यांच्यासोबत तिदमे यांचा नेहमीच संघर्ष राहिला आहे. यानंतर चुंभळे आणि त्यांचे पुत्र अजिंक्य हे तिदमेंबाबत काय भूमिका घेतात, हेदेखील महत्त्वाचे ठरणार आहे. मात्र भाजपच्या इतर इच्छुकांना हा प्रवेश किती रुचेल हेदेखील सांगणे अवघड आहे. एखाद्या दुसऱ्या नगरसेवकाने शिवसेना सोडली म्हणजे सिडकोचा गड हलला अशी सुतराम शक्यता नसल्याचे निष्ठावंत शिवसैनिकांनी सांगत त्यांच्याऐवजी आता दुसरे नवे नेतृत्व पुढे येईल असा विश्वास व्यक्त केला आहे.

बंटी तिदमे हे कडवट शिवसैनिक म्हणून ओळखले जातात. त्यांनी घेतलेला हा निर्णय दुर्दैवी आहे. तो का घेतला याचे खरं कारण तेच सांगू शकतील. त्यांना संधी आणि न्याय केवळ उद्धव साहेबांच्या नेतृत्वाखालीच मिळाला असता.

- सुधाकर बडगुजर, महानगरप्रमुख

...

सेनेने केलेल्या अभद्र युतीमुळे सर्वत्र मुस्कटदाबी झाली होती. हेदेखील एक कारण आहे. पुढील काळात सेनेचे अनेक पदाधिकारी आणि नगरसेवकदेखील सोबत येणार आहेत.

- प्रवीण तिदमे, महानगरप्रमुख, शिंदे गट

---

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT