Shivsena: गुलाबराव पाटलांचे वक्तृत्व उद्धव ठाकरेंना सहन झाले नाही!

पाळधी (जळगाव) येथे विश्रामगृहाच्या उद्‌घाटनानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जनतेला संबोधीत केले.
Eknath Shinde
Eknath ShindeSarkarnama
Published on
Updated on

जळगाव : गुलाबराव पाटील (Gulabrao Patil) हे चांगले भाषण (Good Orator) करतात, मात्र त्यांना ते सहन झाले नाही, असे उद्धव ठाकरे (Uddhav Thackray) यांचे नाव न घेता ते म्हणाले. आपले महत्त्व कमी होईल म्हणून त्यांनी शिवाजी पार्कवरील गुलाबराव पाटलांचे भाषण बंद केले. मंत्रिपदासाठीही त्यांना त्रास दिला, (Harassments) असा आरोप त्यांनी केला. (Eknath Shinde attribute on Uddhav Thackray in Jalgaon public meeting)

Eknath Shinde
`तो` एकनाथ त्रास देत असला तरी `हा` एकनाथ पाठीशी आहे!

पाळधी (जळगाव) येथे पाणीपुरवठा योजनेचे भूमिपूजन एकनाथ शिंदे यांच्या हस्ते करण्यात आले, त्या वेळी ते बोलत होते.

Eknath Shinde
Eknath Shinde: `होय आम्ही कंत्राट घेतले आहे`

ते म्हणाले, अडीच वर्षे त्यांनी घरात बसण्याचे काम केले, आम्ही मात्र अडीच महिन्यांत कामांचा धडाका लावला. ग्रामपंचायत निवडणुकीत सेना-भाजपला मिळालेले यश हीच जनतेने दिलेली राज्यातील सत्तांतराची पावती आहे. हा तर ट्रेलर आहे, पिक्चर बाकी आहे. त्यांना औषधालाही ठेवणार नाही, असा निर्धार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांचे नाव न घेता लगावला.

ते पुढे म्हणाले, की आमची बाळासाहेब यांच्या विचारांची शिवसेना आहे. भाजपसोबत आम्ही युती केली आहे. ग्रामपंचायत निवडणुकीत आमच्या युतीला कौल देऊन कामाची पावती दिली आहे. जर राज्यात महाविकास आघाडी राहिली असती तर राष्ट्रवादीने शिवसेनेला गिळले असते. राष्ट्रवादी पराभूत मतदारसंघात उमेदवारांना ताकद देत होती, त्या मुळे शिवसेना हाताच्या बोटावर मोजण्यासह शिल्लक राहणार नाही, हे लक्षात आल्याने आपण सावध केले.

मात्र झोपेचे सोंग घेणारे जागे कसे होणार? त्यामुळे आपण उठाव करून भाजपसोबत युती केली. आमची ही नैसर्गिक युती आहे, त्यामुळे गद्दार कोण? हे जनतेने ठरवले आहे. आम्ही अभद्र युतीविरुद्ध उठाव केला, असे ते म्हणाले. अडीच महिन्यांत आम्ही आमच्या कामाने उत्तर दिले आहे. त्यांनी गोमूत्र शिंपडले तरी त्यांना काहीही न बोलता कामाने उत्तर देणार आहोत. यापुढे आम्ही अशीच जनतेची कामे करणार आहोत, अशी ग्वाही शिंदे यांनी दिली.

यावेळी पाणीपुरवठामंत्री गुलाबराव पाटील, ग्रामविकासमंत्री गिरीश महाजन, उद्योगमंत्री उदय सामंत, कृषिमंत्री अब्दुल सत्तार, आमदार किशोर पाटील, चिमणराव पाटील, शहाजीबापू पाटील, लताताई सोनवणे, सुरेश ऊर्फ राजूमामा भोळे, चंदू पटेल, खासदार उन्मेष पाटील, माजी आमदार प्रा. चंद्रकांत सोनवणे आदी व्यासपीठावर उपस्थित होते.

....

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com