Ram Shinde and Rohit Pawar Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Karjat Bazar Samiti : कर्जत बाजार समितीच्या दोन जागांची फेरमतमोजणी; रोहित पवार- राम शिंदेंची प्रतिष्ठा पणाला

Karjat APMC News: या फेरमतमोजणीतील निकालावरच बाजार समितीचा सभापती आणि उपसभापती ठरणार आहे.

सरकारनामा ब्यूरो

नगर : नगर जिल्ह्यातील कर्जत कृषी उत्पन्न बाजार समितीच्या दोन जागांसाठी आज फेरमतमोजणी होणार आहे. या बाजार समितीत राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार आणि भाजप आमदार राम शिंदे यांच्या गटाला प्रत्येकी दोन जागा मिळाल्या हेात्या. मात्र, शिंदे गटाच्या दोन सदस्यांनी फेरमतमोजणीची मागणी केली होती. (Recounting of two seats in Karjat Bazar samiti)

दरम्यान, आमदार पवार (Rohit Pawar)-आमदार शिंदे (Ram Shinde) यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. आता फेरमतमोजणीत काय होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. या फेरमतमोजणीतील निकालावरच बाजार समितीचा सभापती आणि उपसभापती ठरणार आहे. याशिवाय कोणाची सत्ता येणार, हेही फेरमतमोजणीतून पुढे येणार आहे.

आमदार रोहित पवार आणि राम शिंदे यांच्यात कर्जत-जामखेड मतदारसंघात काँटे की टक्कर पहायला मिळत आहे. कर्जत बाजार समितीच्या निवडणुकीत दोन्ही गटाला समसमान नऊ नऊ जागा मिळाल्या होत्या. मात्र, भाजप आमदार राम शिंदे यांच्या गटातील दोन उमेदवारांनी या निकालाला आव्हान देत फेरमोजणीची मागणी केली होती. त्यानुसार आज फेरमोजणी होणार आहे

कर्जत बाजार समितीत राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजपमध्ये सरळ लढत झाली होती. येथील मतदारांनी दोन्ही गटाला प्रत्येकी नऊ जागा दिल्या होत्या. भाजपच्या गोटातील दोन उमेदवारांनी या निकालाला आव्हान दिल हेाते. लिलावती जामदार आणि भरत पावणे यांनी निकालाला आव्हान देत फेरमतमोजणीची मागणी केली होती. त्यानुंषगाने जिल्हा उपनिबंधकांसमोर याबाबतची सुनावणी झाली. त्यात फेरमतमोजणीची मागणी ग्राह्य धरण्यात आली.

उपनिबंधकांनी दिलेल्या आदेशानुसार आज फेरमतमोजणी होत आहे. त्यावरून रोहित पवार यांनी भाजपवर जोरदार हल्लाबोल केला होता. हे म्हणजे सत्तेचा गैरवापर आहे.भाजपकडून रडोबाचा डाव खेळला जात आहे, असेही रोहित पवार यांनी म्हटले होते, त्यामुळे आता फेरमतमोजणीत काय होणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. यासोबतच बाजार समितीच्या सभापतीही कोण होणार हे ठरणार आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT