Republican Party of India
Republican Party of India Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Ramdas Athawale : 'रिपाइं'तील गटबाजी उफाळली; जिल्हाध्यक्ष नियुक्तीचा वाद, रामदास आठवले घेणार 'अ‍ॅक्शन'

Pradeep Pendhare

Ahmednagar News: रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले गट) पक्षातील गटबाजी काही केल्या थांबायला तयार नाही. पक्षाचे अध्यक्ष तथा केंद्रीय मंत्री रामदास आठवले (Ramdas Athawale) हे पाच मार्चला नगर जिल्हा दौऱ्यावर येत आहेत. संगमनेर (Sangamner) आणि अकोले तालुक्यात ते मेळावे घेऊन शक्तिप्रदर्शन करणार आहेत. या पार्श्वभूमीवर नगरमधील 'आरपीआय'मधील गटबाजी पुन्हा उफाळली आहे. नगरमधील शासकीय विश्रामगृह येथे दोन्ही गटाने स्वतंत्र बैठका घेत एकमेकांविरोधात आरोपांच्या फैरी झाडत आपापल्या भूमिकेवर ठाम राहिल्याने तिढा वाढला आहे. (Marathi News)

रिपाइंचे उत्तर महाराष्ट्राचे राज्य सचिव राजाभाऊ कापसे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत पक्षातील गटबाजीच्या राजकारणावर ताशेरे ओढण्यात आले. बेकायदेशीरपणे लादले जात असलेल्या निर्णयाचा निषेध नोंदविण्यात आला. जिल्हा संपर्कप्रमुख पदावर विभागीय जिल्हाध्यक्ष भीमाभाऊ बागूल यांची नियुक्ती करून पक्षात गटबाजी करणाऱ्या श्रीकांत भालेराव यांची हकालपट्टी करण्याची मागणी या वेळी करण्यात आली.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

राजाभाऊ कापसे यांनी रिपाइं पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष रामदास आठवले यांच्याशी एकनिष्ठ असलेले जिल्हाध्यक्ष सुनील साळवे यांच्यासारख्या पदाधिकाऱ्यांची गरज आहे. राहुरी येथे झालेली बैठक आपल्याला विचारात न घेता, चुकीच्या पद्धतीने जिल्हाध्यक्षाची निवड करण्यात आली. पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आठवले यांचे आदेश डावलून ही नियुक्ती बेकायदेशीरपणे करण्यात आली. रिपाइंचे दक्षिण जिल्हाध्यक्ष साळवे हेच असून, त्यांच्या नेतृत्वाखाली पक्षाचे सर्व पदाधिकारी काम करणार असल्याचे सांगितले.

विभागीय जिल्हाध्यक्ष भीमा बागूल यांनी पक्षातील या गटबाजीची माहिती पक्षाध्यक्ष आठवले यांच्या कानावर घालण्यात आली असल्याचे सांगितले. सुनील साळवे यांनी पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आठवले जो निर्णय घेतील, तो मान्य असेल. परंतु विश्‍वासात न घेता झालेली नियुक्ती आम्हाला मान्य नाही, असे सांगितले.

दरम्यान, दुसऱ्या गटाच्या बैठकीत संपर्कप्रमुख तथा राज्य उपाध्यक्ष श्रीकांत भालेराव यांनी गटबाजी करणाऱ्यांवर हल्लाबोल केला. रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (Republican Party of India) पक्षातील पदाधिकारी बदलण्याचा अधिकार हा सर्वस्वी पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा मंत्री रामदास आठवले यांच्याकडे आहेत. त्यांच्या आदेशानेच दक्षिण जिल्हाध्यक्ष पदात फेरबदल करण्यात आला आहे. घेतला गेलेला निर्णय हा स्वतः एकट्याचा नाही. संजय भैलुमे हेच पक्षाचे जिल्हाध्यक्ष असून, त्यांच्या नेतृत्वाखाली सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी एकत्र येण्याचे आवाहन त्यांनी केले.

निवडणुकीच्या (election) तोंडावर माजी जिल्हाध्यक्षांना दोन महिने वाढ कशासाठी पाहिजे? हे सर्वांच्या लक्षात येत आहे. रिपाइं हे मित्र मंडळ नसून, राष्ट्रीय पक्ष आहे. पदाधिकाऱ्यांनी तत्त्वाप्रमाणे वागावे, बालिशपणाने कोणतीही मागणी व आरोप करू नये, चुकीचे आरोप करून राजीनामा मागणाऱ्यांनी आत्मपरीक्षण करावे, पक्षश्रेष्ठी जो आदेश देतील तो पाळला जाणार असल्याचेही श्रीकांत भालेराव यांनी सांगितले.

अमित काळे यांनी नवीन कार्यकारिणीत काम करणाऱ्यांना संधी दिली जाणार असून, सक्रिय कार्यकर्त्यांना सभासद नोंदणी करण्यात येणार असल्याचे या वेळी सांगितले. अजय साळवे यांनी 14 मार्चला बैठक घेऊन सर्वांच्या उपस्थितीमध्ये कार्यकारिणी जाहीर केली जाणार असल्याचे जाहीर केले.

जिल्हाध्यक्ष संजय भैलुमे यांनी तालुकाध्यक्षांनी माजी जिल्हाध्यक्ष विरोधात उठाव करून बदल घडविला आहे. माजी जिल्हाध्यक्षांनी मागील 18 वर्षांत कधीही कार्यकर्त्यांना ताकद दिलेली नाही. निवडणुकीत मलिदा लाटण्यासाठी त्यांचा वापर केला, अजूनही त्यांना निवडणुका डोळ्यांसमोर ठेवून दोन महिन्यांची अधिकची जबाबदारी पाहिजे आहे,अ सा आरोप केला.

(Edited By-Ganesh Thombare)

R

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT