Vikhe Patil News : कुलगुरूंसमोरच मंत्री विखेंनी काढले शिक्षण व्यवस्थेचे वाभाडे; पंतप्रधानांची भेट घेऊन...

Savitribai Phule Pune University : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्‍या नगर येथील उपकेंद्राचे उद्घाटन पालकमंत्री राधाकृष्‍ण विखे यांच्‍या हस्ते झाले. या वेळी ते बोलत होते.
Radhakrishna Vikhe Patil
Radhakrishna Vikhe PatilSarkarnama

Ahmednagar News: सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरू यांच्यासमोरच महसूलमंत्री राधाकृष्ण विखे यांनी विद्यापीठ देत असलेल्या चाकोरीबद्ध शिक्षण व्यवस्थेचे वाभाडे काढले. पीएच.डी. झालेला ग्रामसेवक पदासाठी अर्ज करतो आहे. असे असेल, तर शिक्षण व्यवस्था सुधारण्यासाठी नेमलेल्या यूजीसी आणि एआयसीटीसारख्या संस्थांनी पोरखेळ आणि एकाधिकारशाही चालवली आहे, असे समजायचे का ? असा सवाल त्यांनी केला.

विद्यापीठांनी याला विरोध केला पाहिजे. पंतप्रधानांची भेट घेऊन याबाबत आपण बोलणार असून, जिल्ह्यांमध्ये असलेल्या शैक्षणिक संस्थांची संख्या लक्षात घेऊन प्रत्येक जिल्ह्यात आता स्वतंत्र विद्यापीठ निर्माण करण्याची मागणी करणार असल्याचे मंत्री राधाकृष्ण विखे यांनी सांगितले. (Marathi News)

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्‍या (Savitribai Phule Pune University) नगर येथील उपकेंद्राचे उद्घाटन पालकमंत्री राधाकृष्‍ण विखे (Radhakrishna Vikhe Patil) यांच्‍या उपस्थितीत झाले. उच्‍च व तंत्रशिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील हे दूरदृष्‍य प्रणालीद्वारे या कार्यक्रमात सहभागी झाले होते. खासदार डॉ. सुजय विखे, जिल्‍हाधिकारी सिद्धाराम सालीमठ, जिल्हा बँकेचे चेअरमन शिवाजी कर्डिले, विद्यापीठाच्‍या व्‍यवस्‍थापन परिषदेचे सदस्‍य राजेंद्र विखे, कुलगुरू डॉ. सुरेश गोसावी, प्र. कुलगुरू डॉ. पराग काळकर यांच्‍यासह व्‍यवस्‍थापन परिषदेचे सदस्‍य उपस्थित होते.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

Radhakrishna Vikhe Patil
Shivajirao Adhalrao Patil : आढळरावांना लोकसभेची वाट बिकट; मोहितेंनंतर विलास लांडेचाही विरोध, काय आहे कारण?

मंत्री विखे म्हणाले, "केंद्र सरकारने 35 वर्षांनंतर नवीन शिक्षण धोरण लागू केले आहे. याची अंमलबजावणी होताना दिसत नाही. या नवीन शैक्षणिक धोरणाच्या अंमलबजावणीत इतर राज्य पुढे निघून गेली आहेत. राज्यातील विद्यापीठांनी चार भिंतीच्या आत राहण्यापेक्षा एका मिशन मोडमध्ये येणे गरजेचे आहे. आजचे शिक्षण पदवीधर निर्माण करतात, पण पदवीधर निर्माण करणारी या कारखानदारीचे भविष्य काय ? पीएच.डी. झालेला ग्रामसेवक पदासाठी अर्ज करतो आहे. यातून विद्यापीठांनी काही धडा घेतला पाहिजे.

विद्यापीठांनी आपली व्‍याप्‍ती वाढविणे गरजेचे आहे. विद्यापीठं एका चाकोरीमध्‍ये अडकली गेली. एआयसीटी आणि यूजीसी यांसारख्‍या कमिट्यांच्‍या मार्गदर्शक सूचनांमुळे आजपर्यंत संस्‍था कार्यरत राहिल्‍या, परंतु आता या कमिट्यांचेच योगदान काय ? असा प्रश्‍न विचारण्‍याची वेळ आली आहे, असे स्‍पष्‍ट करून, याबाबत आता केव्‍हा तरी प्रधानमंत्र्यांसोबत आपण बोलणार असून, जिल्‍ह्यांमध्‍ये असलेल्‍या शैक्षणिक संस्‍थाची संख्‍या लक्षात घेऊन प्रत्‍येक जिल्‍ह्यात आता स्‍वतंत्र विद्यापीठ निर्माण करण्‍याची मागणी करणार असल्याचे मंत्री विखे यांनी सांगितले.

...तर मान्यता रद्द करा, विखेंची कुलगुरूंना सूचना

शिक्षण व्‍यवस्‍थेमध्‍ये कोचिंग क्‍लासचा वाढलेला हस्‍तक्षेप हे व्‍यवस्‍थेचं अपयश आहे. या कोचिंग क्‍लासवर आपण कुठलेही नियंत्रण आणू शकलो नाही. महाविद्यालयात येणारा विद्यार्थी या कोचिंग क्‍लासकडे का वळाला ? याचे आत्‍मपरीक्षण करण्‍याची गरज आहे. कोचिंग क्लासने धुमाकूळ घातला आहे. ही दुकाने उघडली गेली आहेत. काही अनुदानित महाविद्यालये कोचिंग क्लासेस चालवत आहेत. अशा महाविद्यालयांचा शोध घेऊन त्यांची मान्यता रद्द करण्याची सूचना मंत्री विखे यांनी कुलगुरू डॉ. सुरेश गोसावी यांच्याकडे केली.

'कौशल्य विकासाचे कोर्स तातडीने सुरू करा'

शिक्षणाच्‍या परिभाषा सर्व बदलल्‍या आहेत. एकाच वेळी अनेक विद्या शाखांचे ज्ञान संपादन करण्‍याची प्रक्रिया गतीने पुढे जात आहे. यामध्‍ये पुणे विद्यापीठालाही मागे राहून चालणार नाही. कारण केवळ बीए,बी.कॉम.सारख्‍या तत्‍सम पदव्‍या घेऊन विद्यार्थी आता स्‍पर्धेत टिकू शकणार नाही.

यासाठी या पदवी शिक्षणाबरोबरच विद्यार्थ्‍यांना कौशल्‍य आणि तांत्रिक शिक्षणही कसे घेता येईल, याचाही विचार व्‍हावा, असे सूचित करून मंत्री विखे यांनी नगर येथे सुरू झालेले उपकेंद्र हे कौशल्‍य शिक्षणाचे एक महत्त्वपूर्ण केंद्र ठरावे, यासाठी कौशल्‍य विकासाचे सर्व कोर्स येथे तातडीने सुरू करून विद्यार्थ्‍यांना संधी देण्‍याची व्‍यवस्‍था निर्माण करावी, अशा सूचना दिल्या.

मंत्री चंद्रकांत पाटील यांनीदेखील सुनावले

"नगरमध्ये विद्यापीठाचे उपकेंद्र व्हावे, यासाठी विद्यार्थी परिषदेत असल्यापासून आंदोलने केली. इमारत पूर्ण झाली आहे. आता या इमारतीतून काम करण्याची जबाबदारी विद्यापीठाची आहे. उपकेंद्रात बसणाऱ्या अधिकाऱ्याने प्रत्येक गोष्ट पुण्याला विचारतो, असे सांगून काम करणार असेल, तर उपयोग होणार नाही," अशा शब्दांत उच्च, तंत्रशिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील यांनी सुनावले. कॉमर्स, आर्ट्स आणि सायन्स या विषयांपेक्षा व्यावसायिक कोर्स उपलब्ध करून देण्यावर विद्यापीठांनी भर दिला पाहिजे, अशा सूचना मंत्री चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी या वेळी केल्या.

(Edited By-Ganesh Thombare)

R

Radhakrishna Vikhe Patil
Ajit Pawar: अमोल कोल्हेंच्या होमपीचवर आज अजितदादांची तोफ धडाडणार; 'हे' मुद्दे केंद्रस्थानी

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com