Vaibhav Pichad and Kiran Lahamate Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Gram Panchayat Election Results: अकोले तालुक्यात कौल कोणाच्या बाजूने ? पिचड - लहामटे गटांनी केला मोठा दावा

Vaibhav Pichad and Kiran Lahamate : माजी आमदार वैभव पिचड यांना आगामी निवडणुकांना बळ मिळणार ?

Ganesh Thombare

प्रदीप पेंढारे :

Ahmednagar News: अकोले तालुक्यातील 27 ग्रामपंचायत निवडणुकांचा आज निकाल जाहीर झाला. यात 14 ग्रामपंचायतींवर भारतीय जनता पक्ष आघाडीच्या पिचड गटाने सत्ता मिळवल्याचा दावा भाजप तालुकाध्यक्ष सीताराम भांगरे यांनी केला.

तर 15 ग्रामपंचायतींवर आमदार डॉ.किरण लहामटे (अजित पवार गट) गटाने सत्ता मिळवल्याचा दावा केला आहे. दरम्यान, पिचड गटाचे वर्चस्व राहिल्याने माजी मंत्री मधुकरराव पिचड आणि माजी आमदार वैभव पिचड यांना आगामी निवडणुकांना बळ मिळणार, असे सध्या तरी दिसत आहे.

या निवडणुकीतील 27 ग्रामपंचायतींपैकी 6 ग्रामपंचायती बिनविरोध झाल्या होत्या. उर्वरित 21 ग्रामपंचायतींसाठी सार्वत्रिक आणि चार ठिकाणी पोटनिवडणुकीसाठी रविवारी मतदान झाले. तत्पूर्वी कौठवाडी, आंबेवंगण, खानापूर, कोकणवाडी, देवगाव, पेढेवाडी या ग्रामपंचायती बिनविरोध झाल्या.

उर्वरित कोंभाळणे, पैठण, जहागिरदारवाडी, बारी, साम्रद, रतनवाडी, मुतखेल, शिसवद, पाचनई, अंबित, पेंडशेत, वांजुळशेत, रेडे, सुगाव बुद्रुक, गर्दणी, पिंपळगाव नाकविंदा, एकदरे, तिरडे, पाचपट्टावाडी, घोटी, पिंपळदरावाडी ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत चुरस झाली. तसेच पिंपळगाव निपाणी, पिंपरकणे, कोतूळ व केळुंगण येथे पोटनिवडणूक झाली.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

लोकनियुक्त सरपंचाच्या निवडीवर आमदार डॉ. किरण लहामटे, माजी आमदार वैभव पिचड, जिल्हा बँकेचे संचालक अमित भांगरे यांच्यासह सर्वच राजकीय पक्षाच्या नेत्यांच्या गटाने दावा सांगितला आहे. ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत सर्वच नेत्यांच्या गटाने जोरदार ताकद लावली होती. काही ग्रामपंचायतींमध्ये सत्तांतर झाले. यात भाजप आणि राष्ट्रवादीचा अजित पवार गटात लढाई झाली.

यामुळे निवडणुकीत कोणत्या बाजून कौल जाणार, याची उत्सुकता होती. मतमोजणीत आज चित्र स्पष्ट झाले. भाजपप्रणित पिचड गटाला 14 ग्रामपंचायतींवर सत्ता मिळवल्याचा दावा करण्यात आला आहे. राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाला 15 ग्रामपंचायतींवर सत्ता मिळाल्याचे सांगितले जात आहे. दावे-प्रतिदाव्यांमुळे निवडून आलेल्यांना आपण नेमके कोणत्या गटाचे हा प्रश्न पडला आहे.

Edited By - Ganesh Thombare

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT