Grampanchayat Election News : सातारा, जावळीत शिवेंद्रराजेंचाच डंका; सर्वच ग्रामपंचायतींवर वर्चस्व

Shivendraraje Bhosale शिवेंद्रसिंहराजे यांनी सर्व ग्रामपंचायतीचे नवनिर्वाचित सरपंच, सदस्य, आजी- माजी पदाधिकारी, कार्यकर्ते आणि ग्रामस्थांचे अभिनंदन केले असून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
Shivendraraje with the winning candidates
Shivendraraje with the winning candidatessarkarnama
Published on
Updated on

Grampanchayat Election Result : सातारा व जावली तालुक्यातील ग्रामपंचायतींसाठी झालेल्या सार्वत्रिक व पोटनिवडणुकीत आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले गटाने बाजी मारली आहे. सर्वच ग्रामपंचायतीवर आमदार गटाच्या विचाराचे उमेदवार निवडून आले आहेत.

सातारा विधानसभा मतदारसंघातील सातारा तालुक्यातील Satara Taluka पोटनिवडणूक लागलेल्या कोंडवे (सदस्य - १), पांगारे (सदस्य-१), कोंढवली (सदस्य- १) येथे शिवेंद्रसिंहराजे गटाच्या उमेदवारांची निवड झाली. सार्वत्रिक निवडणूक लागलेल्या धावडशी, कारी, लुमानेखोल, नित्रळ, वडगांव, अंबवडे आदी ग्रामपंचायतींवरही शिवेंद्रसिंहराजे Shivendraraje Bhosale गटाने सत्ता मिळवली

जावली तालुक्यातील एकूण २४ ग्रामपंचायतींची निवडणूक लागली होती. त्यापैकी १८ ग्रामपंचायती बिनविरोध झाल्या. या सर्वच ग्रामपंचायती आमदार शिवेंद्रसिंहराजेंच्या विचाराच्या आहेत.

तसेच कुरळोशी, वाघदरे, भामघर (सरपंच), सांगवी (सदस्य-१), बिभवी, आनेवाडी या ग्रामपंचायतींची निवडणूक झाली. या सर्वच ग्रामपंचायतींवर आ. शिवेंद्रसिंहराजे गटाच्या उमेदवारांनी बाजी मारली. Maharshtra Political News

Shivendraraje with the winning candidates
Satara Political News : शिवेंद्रसिंहराजे भडकले; सातारा- जावलीतील दुष्काळाकडे दुर्लक्ष नको

आमदार शिवेंद्रसिंहराजे यांनी सर्व ग्रामपंचायतीचे नवनिर्वाचित सरपंच, सदस्य, आजी- माजी पदाधिकारी, कार्यकर्ते आणि ग्रामस्थांचे अभिनंदन केले असून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

Edited By : Umesh Bambare

Shivendraraje with the winning candidates
BJP Manifesto : 500 रुपयांत गॅस सिलिंडर, विवाहित महिलांना 12 हजार रुपये; छत्तीसगडच्या जाहीरनाम्यात भाजपनं...

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com