Eknath Khadse & Chandrakant Patil Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Eknath Khadse News : एकनाथ खडसे कुटुंबीयांना तब्बल १३७ कोटींचा दंड?

Sampat Devgire

Maharashtra Political News : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे आणि त्यांचे कट्टर विरोधक आमदार चंद्रकांत पाटील यांच्यातील राजकीय वॉरने गंभीर वळण घेतले आहे. यासंदर्भात राज्य सरकारने अवैध गौणखनिज उत्खनन प्रकरणी चक्क १३७ कोटी दंडाची नोटीस बजावली आहे. (State Government except a Report of revenue committee on the issue)

महसूल विभागाने (Maharashtra Government) ही नोटीस बजावली आहे. आमदार चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांच्या तक्रारीवरून झालेल्या चौकशीत राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) नेते एकनाथ खडसे (Eknath Khadse) व त्यांच्या कुटुंबीयांनी ही नोटीस बजावण्यात आली आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

यासंदर्भात तहसीलदारांनी नोटीस बजावली आहे. त्यात सातोड (मुक्ताईनगर) परिसरातील जमिनीत १.१८ लाख ब्रास मुरमाचे उत्खनन आणि वाहतूक झाल्याचा दावा आहे. त्यासाठी खडसे, त्यांच्या पत्नी मंदाकिनी खडसे, कन्या रोहिनी खडसे आणि स्नुषा खासदार रक्षा खडसे यांना ही नोटीस बजावण्यात आली आहे.

एकंदर सहा जमीनमालकांना दोन आठवड्यांपूर्वी अशी नोटीस दिली आहे. त्यात उत्खनन केलेल्या खनिजाचे मूल्य २६ कोटी दर्शविण्यात आले आहे. यासंदर्भात खडसे यांचे विरोधक आमदार पाटील यांनी तक्रार केली होती. त्यावर विधिमंडळात चर्चा झाली होती. त्यात समिती नियुक्त करण्यात आली होती. या समितीचा अहवाल शासनाने स्वीकारल्यावर ही कारवाई झाली.

दरम्यान, अशी नोटीस मिळाल्याने तो चर्चेचा विषय ठरला आहे. त्याला आपोआपच राजकीय स्वरूप प्राप्त झाले आहे, अशी नोटीस मिळाल्यावर त्यावर उपविभागीय अधिकाऱ्यांकडे अपील करता येते. महसूल विभागाच्या विविध यंत्रणांना त्याबाबत सुनावणीचे अधिकार असले, तरीही त्यात राजकीय हस्तक्षेप होतो हे लपून राहिलेले नाही.

दरम्यान, याबाबत एकनाथ खडसे, ही राजकीय स्वरूपाची कारवाई आहे. संबंधित जमिनी आमच्या कुटुंबीयांच्या नावे आहेत. मात्र, त्या उत्खननाशी आमचा कीहीही संबंध नाही. योग्य वेळी आणि योग्य यंत्रणेकडे त्याबाबत वस्तुस्थिती सादर करू असे सांगितले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT