Radhakrishna Vikhe Patil and Nilesh Lanke  Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Vikhe Patil vs Lanke : निलेश लंके बालिश, त्यांना दुसऱ्यांदा निवडून यायची इच्छा दिसत नाही; विखे पाटलांचा खोचक टोला

Ahmednagar Politics: महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांची निलेश लंके यांच्यावर घणाघाती टीका

सरकारनामा ब्यूरो

राजेंद्र त्रिमुखे :

Ahmednagar: महसूलमंत्री राधाकृष्ण विखे गुरवारी (दि.15 जून) नगर शहरात विविध कार्यक्रमाच्या निमित्ताने आले होते. जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित स्वातंत्र्य सैनिक आणि त्यांच्या जोडीदारांचा सन्मानपत्र देऊन सन्मान यावेळी करण्यात आला. त्याचबरोबर पंढरपूर वारी संदर्भात एक वॉर रूम सुरू करण्यात आली. त्याचा शुभारंभ राधाकृष्ण विखे यांच्या हस्ते करण्यात आला.

राधाकृष्ण विखे पाटील यांचा गुरवारी वाढदिवस असल्याने जिल्हाभरातील कार्यकर्ते आणि महसूलचे अनेक अधिकारी हे विखेंच्या भेटीसाठी आवर्जून उपस्थित होते. कार्यक्रमानंतर पत्रकारांशी वार्तालाप करताना विविध मुद्द्यांना विखे यांनी उत्तरे दिली. यावेळी राधाकृष्ण विखे पाटील यांनी आमदार निलेश लंके यांच्यावरही जोरदार निशाणा साधला.

आळंदीमध्ये झालेल्या वारकऱ्यांवर लाठी हल्ल्याबाबत पारनेरमधील वारकरी भागा महाराज घोलप यांच्यावर झालेला हल्ला आणि त्यानिमित्ताने राष्ट्रवादीचे आमदार निलेश लंके यांनी वारकऱ्यांवर झालेल्या हल्ल्याचा निषेध करत "वारकऱ्यावर हल्ला हा सरकारचा भ्याडपणा असल्याचं लंके म्हणाले होते.

तसेत जे वारकरी जखमी झाले त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू असून त्यांची यंदाची वारी पोलिसांमुळे चुकलेली आहे, त्यामुळे यंदा मुख्यमंत्री यांनी आषाढी एकादशीला विठ्ठलाची पूजा न करता ह्या वारकऱ्याला तो मान मिळावा, अशी मागणी लंके यांनी केली होती. आमदार लंकेंच्या या मागणीबाबत राधाकृष्ण विखे पाटील यांनी भाष्य केलं असून त्यांना खोचक टोला लगावला आहे.

राधाकृष्ण विखे पाटील म्हणाले, "पारनेरच्या आमदारांना अजून बरच काही शिकायचंय आहे. ते अनेकदा बालिश हरकती करत राहतात. मला वाटतं ते पहिल्यांदाच निवडून आलेत त्यांना पुन्हा निवडून यायचं का नाही हा विषय आहे", असं म्हणत राधाकृष्ण विखे पाटलांनी आमदार लंके यांना टोला लगावला.

दरम्यान, 2024 च्या लोकसभा निवडणुकीसाठी अहमदनगर दक्षिण लोकसभा मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेसकडून आमदार निलेश लंके यांचे नाव चर्चेत आहे. त्या दृष्टीने आमदार लंके यांनी दक्षिण नगर जिल्ह्यातील विविध तालुक्यांमध्ये आपला जनसंपर्क सातत्याने विविध कार्यक्रमाचे निमित्ताने वाढवलेला आहे.

एकूणच जनमानस पाहता लंके यांना प्रतिसाद मिळत असल्याचं बोललं जात आहे. असं असतानाच भाजपचे खासदार सुजय विखे यांना लंके यांचे मोठं आव्हान असल्याचं राजकीय जाणकार सांगतात. या पार्श्वभूमीवर विखे यांनी आमदार लंके यांच्यावर केलेली टीका ही बोचरी असली तरी नेमक्या कोणत्या उद्देशाने केली? हेही राजकीयदृष्ट्या तपासून पहावं लागणार आहे.

Edited By : Ganesh Thombare

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT