राजेंद्र त्रिमुखे :
Ahmednagar News: राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या गुप्त भेटीमुळे राजकीय वर्तुळात उलट-सुलट चर्चांना उधाण आले. एवढंच नाही तर या गुप्त भेटीवरून काँग्रेसचे नेते आणि विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वड्डेटीवार यांनी मोठा दावा करत "शरद पवार सोबत आल्यास अजित पवार यांना मुख्यमंत्रीपद देणार अशी भाजपाने अट ठेवली आहे", असे म्हटले होते. आता याच दाव्यावरून महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटलांनी वड्डेटीवारांवर जोरदार निशाणा साधला.
"लोकप्रियता मिळवण्यासाठी असे दावे केले जातात, मात्र, वड्डेटीवारांनी अशा प्रकारचा दावा कशाच्या आधारावर केला, याचेही उत्तर त्यांनी दिले पाहिजे", असे विखे पाटील म्हणाले. "काँग्रेसमध्येही फूट पडणार असल्याच्या केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या वक्तव्याला दुजोरा देवून काँग्रेसमध्ये सध्या 'वेट अॅण्ड वॉच'ची स्थिती आहे", असे महसूलमंत्री विखे पाटलांनी म्हटले आहे.
गुरुवारी शिर्डीत 'शासन आपल्या दारी' कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमाची तयारीची पाहणी मंत्री विखे यांनी बुधवारी केली. यावेळी त्यांनी, शरद पवार आणि अजित पवार यांच्या भेटीच्या अनुषंगाने वडेट्टीवार यांनी केलेल्या दाव्यावर बोलताना वडेट्टीवार यांच्या वक्तव्याला आधार काय?, असा प्रश्न उपस्थित केला. तसेच नारायण राणे यांनी म्हंटल्याप्रमाणे काँग्रेसमध्येच फूट पडणार असून अनेक नेते 'वेट अॅण्ड वॉच'च्या भूमिकेत असल्याचे विखे पाटील म्हणाले.
दरम्यान, नगर जिल्ह्यात सरासरीपेक्षाही कमी पाऊस झाल्याने परिस्थिती गंभीर बनली असून खरीपाचेही काही अंशी क्षेत्र वाया गेले आहे. या पार्श्वभूमीवरच पशुधनाकरिता चार उपलब्ध करुन देण्याचे आवाहन विचारात घेवून अंतरजिल्हा चारा वाहतुकीवर बंदी घालण्याचा निर्णय घेतला असल्याची माहीती राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिली.
Edited By- Ganesh Thombare
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.