Rohit Kundalwal Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

BJP Politics: सावकारी करणारा भाजप नेता म्हणतो, " सरकार उलथवण्यासाठीचे ते ६०० खोके माझ्याकडेच होते"

Rohit Kundalwal; BJP leader's claim of moneylender creates stir in police-अवैध सावकारी आणि अपहरण करणाऱ्या रोहित कुंडलवाल हा भाजपनेता पोलिसांच्या कोठडीत.

Sampat Devgire

Rohit Kundalwal News: भारतीय जनता पक्षाचा नेता रोहित कुंडलवार आणि त्याच्या कुटुंबीयांवर पोलिसात गुन्हा दाखल आहे. अवैध सावकारी आणि त्यातून घडलेल्या प्रकरणातून धक्कादायक बाबी पुढे येत आहेत. त्यामुळे हे प्रकरण सध्या चर्चेचा विषय आहे.

खाजगी सावकारी करताना तीस लाखांच्या कर्जाच्या बदल्यात ८० लाखाची वसुली करण्यात आली. त्यानंतर पुन्हा खंडणीसाठी व्यापाऱ्याचे अपहरण करण्यात आले. त्यामुळे भाजप नेता रोहित कुंडलवाल आणि त्याचे वडील कैलास कुंडलवार यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

भाजप नेता रोहित कुंडलवाल सध्या पोलिसांच्या ताब्यात आहे. या तपासातून अनेक धक्कादायक बाबी पुढे आल्या आहेत. त्यावर विश्वास ठेवावा की नाही, अशी शंका पोलिसांनाही येत आहे. कदाचित तपासाची दिशा बदलण्यासाठी भाजप नेता कुंडलवाल अशी दिशाभूल करीत असावा असे बोलले जाते.

माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे सरकार पाडण्यात आले. त्यासाठी प्रत्येक आमदाराला ५० खोकी देण्यात आल्याचे आरोप झाला होता. या अनुषंगाने रोहित कुंडलवाल यांनी अनेकांकडे ते सरकार पाडण्यासाठीचे ते ६०० खोके माझ्याकडेच होते. कंटेनरमध्ये ते घेऊन मी फिरत होतो. अशी धक्कादायक माहिती दिली आहे.

अवैध सावकारी करणाऱ्या कुंडलवालच्या विरोधात सध्या शहराच्या विविध पोलीस ठाण्यांमध्ये गुन्हे दाखल आहेत. त्यामुळे गेले तीन आठवडे तो विविध पोलीस ठाण्यांच्या कोठडीत आहे. यावेळी झालेल्या तपासात त्याने नागरिकांना दिलेल्या आणि सांगितलेल्या कपल कल्पित कथा उघड होत आहेत.

रोहित कुंडलवालसह त्याच्या वडील आणि कुटुंबीयांच्या विरोधात गुन्हा दाखल आहे. रोहित कुंडलवाल वगळता उर्वरित सर्व फरार आहेत. महिनाभराच्या तपासात त्यांचा शोध लागू शकला नाही. त्यामुळे पोलीस या प्रकरणावर गांभीर्याने लक्ष देत आहे.

भाजप नेता रोहित कुंडलवाल याचे माजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांसह भाजपच्या विविध नेत्यांचा समवेत फोटो आहेत. सोशल मीडियावर त्याने ते सातत्याने व्हायरल केले आहेत. विविध राजकीय पक्षांच्या नेत्यांची आपले संबंध असल्याचा बडेजाव मीरविण्यासाठी त्याने हे केले होते. ६०० खोक्यांचा दावाही असाच बनावट असण्याचीच शक्यता अधिक आहे.

---------

२५ वर्षे पूर्ण करणारा ई-सकाळ आता कॉमस्कोअरमध्ये Number One डिजिटल माध्यमांच्या क्षेत्रातील नवी झेप

-----

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT