Gulabrao Devkar : शिंदे गटाचं टेन्शन वाढलं ! गुलाबराव देवकरांच्या राष्ट्रवादी पक्षप्रवेशाला विरोध करणाऱ्याचं मतपरिवर्तन

Jalgaon Politics : अजित पवार गटाच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांनी आधी विरोध केला होता मात्र आता देवकरांच्या स्वागताची भूमिका घेतली आहे.
Gulabrao Deokar | Gulabrao Patil
Gulabrao Deokar | Gulabrao PatilSarkarnama
Published on
Updated on

Maharashtra Politics : राष्ट्रवादी शरद गटाचे माजी मंत्री गुलाबराव देवकर यांनी अजित पवार गटात जाण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र त्यांच्या राष्ट्रवादी (अजित पवार गट) प्रवेशाला स्थानिक पदाधिकाऱ्यांनी सुरुवातीला विरोध दर्शविला होता. मात्र, त्याच पदाधिकाऱ्यांचे आता मतपरिवर्तन झाले असून देवकरांच्या पक्षप्रवेशाला त्यांनी ग्रीन सिग्नल दिला आहे.

स्थानिक पदाधिकाऱ्यांच्या विरोधामुळे पक्षश्रेष्ठी अनुकूल असतानाही देवकर यांचा अजित पवार गटातील प्रवेश रखडला होता. मात्र, अजित पवार गटाच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांनी आता देवकरांच्या स्वागताची भूमिका घेतली आहे. त्यामुळे जळगाव ग्रामीण मध्ये सक्रीय असलेल्या शिंदे गटाच्या पदाधिकाऱ्यांमध्ये अस्वस्थता वाढली आहे. शिवसेना शिंदे गटाचे नेते गुलाबराव पाटील यांनी गुलाबराव देवकर यांना कोणताही पक्ष स्विकारणार नाही असे म्हटले होते.

विधानसभेच्या निवडणुकीत शिवसेना शिंदे गटाचे गुलाबराव पाटील व राष्ट्रवादी शरद पवार गटाचे गुलाबराव देवकर यांच्यातील हायव्होलटेज लढत महाराष्ट्राला पाहायला मिळाली. त्यानंतर निवडणुकीत पराभूत झालेल्या गुलाबराव देवकरांनी अजित पवार गटात जाण्याचा निर्णय घेतला पण स्थानिक पदाधिकाऱ्यांनी त्यांच्या पक्षप्रवेशाला तीव्र विरोध केल्याने आजवर त्यांचा पक्षप्रवेश होऊ शकला नाही.

अजित पवार गटाचे जळगाव जिल्हाध्यक्ष संजय पवार यांनी देवकर यांच्या प्रवेशासंदर्भात सूचक वक्तव्य केलं आहे. त्यातून त्यांचे मतपरिवर्तन झाल्याचे दिसते आहे. ते म्हणाले, जो कोणी चांगला पदाधिकारी पक्ष संघटन वाढवेल, त्यांचे पक्षात स्वागत करण्याची आमची भूमिका आहे. विरोध होतच असतो. कोणी म्हणते घेऊ नये, कोणी म्हणते घ्या, आमचे पक्षश्रेष्ठी जो आदेश देतील तो आम्हाला मान्य असेल, असे जिल्हाध्यक्ष पवार यांनी म्हटले आहे. केवळ गुलाबराव देवकर यांनाच नाही तर शरद पवार गटाच्या कोणत्याही मोठ्या पदाधिकाऱ्याला आम्ही अजित पवार गटात येण्याचे आवाहन केले आहे संजय पवार यांनी सांगितले.

देवकरांची जेलवारी निश्चित

दरम्यान शिंदे गटाचे गुलाबराव पाटील यांनी गुलाबराव देवकर यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप करत त्यांना डिवचलं होतं. देवकरांनी मजुरांचे पैसे खाल्ले, निवडणुकीच्या वेळेला जिल्हा बँकेतून गुलाबराव देवकरांनी दहा कोटींचं कर्ज काढल्याचं उघडकीस आले आहे. निवडणुकीच्या काळात कर्ज काढून रोख पैसे ठेवणे ही अत्यंत चुकीची बाब आहे. त्यांच्याविरोधात निवडणूक आयोग व अँटी करप्शनकडे तक्रार करणार असल्याचे पाटील यांनी सांगितलं होतं. देवकर कोणत्याही पक्षात गेले तरी त्यांची जेलवारी निश्चित असल्याचे गुलाबराव पाटील म्हणाले होते.

Gulabrao Deokar | Gulabrao Patil
BJP : स्थापना दिनानिमित्त भाजपचे 'स्पेशल सेलिब्रेशन', आठवडाभर जंगी कार्यक्रमांची रेलचेल

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com