Rohit Pawar Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Rohit Pawar Politics : 'मुख्यमंत्री दोन तासांसाठी आले मग एवढ्या मोठ्या बॅगा कशाला' रोहित पवारांनी डिवचले

Sampat Devgire

Rohit Pawar News : राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे नेते आमदार रोहित पवार यांनी शिवसेना नेते संजय राऊत यांच्या आरोपाचे समर्थन केले आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बॅगांमध्ये काय होते असा प्रश्न केला आहे.लोकसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी आमदार रोहित पवार आज नाशिकच्या दौऱ्यावर आहेत. पेठ येथे उमेदवार भास्कर भगरे यांच्या प्रचारासाठी त्यांची सभा होत आहे. यावेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे दोन दिवसांपूर्वी नाशिक दौऱ्यावर आले होते. यावेळी त्यांच्या हेलिकॉप्टरमधून पोलिस कर्मचाऱ्यांनी मोठ मोठ्या बॅगा उतरविल्या होत्या. त्यावरून राजकारण तापले आहे. या संदर्भात शिवसेना नेते खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी मुख्यमंत्री शिंदे यांना चांगलेच घेरले आहे. रोहित पवार यांनी देखील संजय राऊत यांचीच लाईन पकडली.

रोहित पवार (Rohit Pawar) म्हणाले, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) दोन तासासाठी नाशिकमध्ये आले होते. एवढ्या अल्पकाळासाठी आल्यानंतर त्यांनी एवढ्या मोठ्या बॅगा का आणल्या? पोलि‍सांना त्या बॅगा उचलाव्या लागल्या. त्यामुळे याबाबतचे आरोप एकदमच निराधार आहेत, असे म्हणता येणार नाही. मुख्यमंत्र्यांनीच याबाबत खुलासा करायला हवा अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.

सध्या सुरू असलेल्या लोकसभा निवडणुकीत सत्ताधारी महायुतीकडून मोठ्या प्रमाणावर गैरप्रकार करण्यात आले आहेत, असा आरोप त्यांनी केला. ते म्हणाले मतदारांवर प्रभाव टाकण्यासाठी महायुतीकडून मोठ्या प्रमाणात पैसे वाटप झाले. गुंडगिरी सुद्धा करण्यात आली. विशेषता बारामती आणि नगर मतदार संघात मोठ्या प्रमाणात पैशांचा वापर झाला. मात्र पैशाचा कितीही वापर केला, तरीही त्याचा काहीही उपयोग होणार नाही.

लोकसभा निवडणुकीत (Loksabha Election) यंदा सत्ताधारी महायुतीकडून दोन हजार कोटी रुपये वाटण्यात येणार आहेत. अशी आमच्याकडे माहिती आहे. त्याबाबतचे अनुभव देखील गेल्या दोन टप्प्यातील निवडणुकींमध्ये दिसून आलेत. नागरिकांना विचारल्यास ते देखील सांगतात महायुतीच्या लोकांनी पैसे वाटले आहेत. मुख्यमंत्री शिंदे यांनी जशा बॅगा आणल्या होत्या तसेच, पोलिस व्हॅन, टँकर, ॲम्बुलन्स यातून देखील पैसे वाटण्यात आले,असा गंभीर आरोप त्यांनी केले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT