Bhushan londhe Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Nashik Crime: धक्कादायक; रामदास आठवलेंचा निकटवर्तीय भूषण लोंढेचा व्हिडिओ, "मेरे कहने पे दिन और रात"

RPI former corporator's son Bhushan Londhe in trouble, new case by police in extortion case, video posted before shooting-‘आरपीआय’च्या माजी नगरसेवक पुत्राने नाशिकच्या सबंध पोलीस यंत्रणेलाच दिले आव्हान, गोळीबारापूर्वी पोस्ट केला व्हिडिओ

सरकारनामा ब्युरो

Nashik Crime News: रामदास आठवले यांचे निकटवर्तीय, माजी नगरसेवक पुत्र भूषण लोंढे यांच्या विरोधात नवा गुन्हा दाखल झाला आहे. लोंढे याने थेट पोलीस यंत्रणेलाच आव्हान दिले होते. त्यामुळे पोलीस यंत्रणा सक्रिय झाली आहे.

रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या माजी नगरसेवकाचा मुलगा तसेच रामदास आठवले यांचा निकटवर्तीय भूषण लोंढे याने थेट पोलिसांनाच आव्हान दिले होते. दोन दिवसांपूर्वी सातपूरच्या हॉटेलमध्ये खंडणीसाठी गोळीबार आणि चॉपरने हल्ला झाला. या प्रकरणात लोंढे सध्या फरार आहे.

या प्रकरणात आता पोलिसांनी धक्कादायक खुलासा केला आहे. संबंधित हॉटेलच्या बाहेर व्हिडिओ शूट करण्यात आला. तो व्हिडिओ समाज माध्यमांवर पोस्ट करण्यात आला. याप्रकरणी पोलिसांनी नवा गुन्हा दाखल केला आहे.

सातपूर येथील ऑरा हॉटेलच्या मालकाकडे खंडणी मागण्यात आली होती. हॉटेल मालक प्रतिसाद देत नसल्याने भूषण लोंढे आणि त्याचे गुन्हेगार साथीदार संतापलेले होते. यातूनच त्यांनी थेट सबंध पोलीस यंत्रणेला आव्हान दिले.

खंडणीसाठी गोळीबार आणि हॉटेल मालकावर हल्ला करण्यापूर्वी व्हिडिओ तयार करण्यात आला होता. हा व्हिडिओ मध्यरात्री हॉटेलच्या बाहेरच शूट करण्यात आला. "काहीतरी मोठा विषय आहे. यंदा लई मोठा विषय. यहा पर मेरे कहने पर दिन और रात..."असे त्या व्हिडिओत म्हटले होते.

प्रकरणी पोलिसांनी आणखी एक गुन्हा दाखल केला आहे. सध्या अटकेत असलेल्या शुभम पाटील उर्फ भुरा, वाघमारे, आकाश उर्फ अभिजीत अडांगळे यांच्या तपासात ही माहिती पुढे आल्याचे तपास अधिकाऱ्यांनी सांगितले. त्यामुळे शहरातील गुन्हेगारी राजकीय आशीर्वादातून वाढत असल्याचे स्पष्ट झाले आहे.

पोलिसांनी काल एक गुन्हा दाखल केला होता. नव्याने भूषण लोंढे यासह व्हिडिओ पोस्ट करणारा अभी रानडे, मयूर निकम, आदित्य लोखंडे आणि अन्य चार जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. भूषण लोंढे हा गुन्हा घडल्यापासून फरार आहे. पोलिसांना अद्याप त्याचा सुगावा लागलेला नाही. महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शहरात वाढणारे गुन्हेगारी हा चिंतेचा विषय बनला आहे.

------

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT