Nashik Collector : शासकीय वाहन दिमतीला तरी नाशिकचे जिल्हाधिकारी निघाले रिक्षातून..

Nashik District Collector Jalaj Sharma travels by rickshaw : नाशिकचे जिल्हाधिकारी जलज शर्मा यांनी शासकीय वाहन असतानाही वेगळा निर्णय घेतला. त्यांच्या या निर्णयाचे नाशिककरांनी स्वागत केले.
Nashik Collector Jalaj Sharma travels from his residence to the district office in a Pink E-Rickshaw driven by a woman beneficiary.
Nashik Collector Jalaj Sharma travels from his residence to the district office in a Pink E-Rickshaw driven by a woman beneficiary.Sarkarnama
Published on
Updated on

Nashik News : नाशिकचे जिल्हाधिकारी जलज शर्मा हे पर्यावरण प्रेमी असून ते पर्यावरणाबाबत नेहमीच सजग असतात. म्हणूनच शासकीय वाहन दिमतीला असतानाही त्यांनी सोमवारी सकाळी घरापासून ते कार्यालयापर्यंत जाण्यासाठी 'पिंक ई रिक्षा' मधून प्रवास केला. त्यांच्या या निर्णयाचे सर्वत्र कौतुक होत असून नाशिककरांनी स्वागत केले.

ज्या महिलेच्या पिंक ई रिक्षात बसून जिल्हाधिकाऱ्यांनी प्रवास केला त्या महिलेचे नाव वैष्णवी उमाकांत साखरे असे आहे. चक्क जिल्हाधिकाऱ्यांनी आपल्या रिक्षात बसून प्रवास केल्याने या महिलेला प्रचंड आनंद झाला. हा माझा बहुमान असून त्यामुळे माझे मनोबल वाढण्यास मदत झाली आहे अशी प्रतिक्रिया या रिक्षा चालक महिलेने दिली.

जिल्हा प्रशासनात वेगवेगळे उपक्रम राबवित जिल्हा प्रशासन गतिमान आणि गरजू नागरिकांना वेळेत आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी जिल्हाधिकारी शर्मा हे नेहमीच प्रयत्नशील असतात. त्यांनी शासकीय योजनांची प्रभावीपणे अंमलबजावणी केल्याबद्दल त्यांचा नागरी सेवा दिनी नवी दिल्ली येथे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत सत्कार करण्यात आला आहे. याशिवाय एक जिल्हा- एक उत्पादन या योजनेची यशस्वी अंमलबजावणी केल्याबद्दल त्यांचा केंद्रीय वाणिज्य मंत्री पियुष गोयल यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला आहे.

Nashik Collector Jalaj Sharma travels from his residence to the district office in a Pink E-Rickshaw driven by a woman beneficiary.
Eknath Shinde : नाशिकच्या 'त्या' आंदोलकांना बघितलं, अन् एकनाथ शिंदेंही आवाक् झाले

जिल्हाधिकारी शर्मा हे पर्यावरणबद्दल सजग असून संवेदनशील आहेत. अलिकडेच चामर लेणी येथे त्यांच्या हस्ते विविध रोपांची लागवड करण्यात आली. तसेच महिन्यातून किमान एक दिवस वाहन न वापरता ते कार्यालयात येतात. त्यासाठी कधी पायी, तर कधी सायकलचा वापर करतात. त्यानुसार ऑक्टोबर महिन्याच्या पहिल्या सोमवारी म्हणजे आज त्यांनी वाहनाऐवजी पिंक रिक्षाची निवड केली. राज्य शासनाने महिलांच्या सक्षमीकरणासाठी पिंक ई रिक्षा योजना आणली आहे. त्यानुसार जिल्ह्यात एक हजार महिलांना जिल्हा महिला व बालविकास विभागाच्या माध्यमातून पिंक रिक्षा देण्याचे नियोजन आहे

जिल्हाधिकारी शर्मा यांनी आज वैष्णवी साकोरे ही भगिनी चालवीत असलेल्या पिंक ई रिक्षातून जिल्हाधिकारी निवास ते जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंतचा प्रवास केला. यावेळी त्यांनी रिक्षा चालविणाऱ्या भगिनीशी संवाद साधला. यावेळी जिल्हा महिला व बालविकास अधिकारी सुनील दुसाणे उपस्थित होते. (Nashik News)

Nashik Collector Jalaj Sharma travels from his residence to the district office in a Pink E-Rickshaw driven by a woman beneficiary.
Eknath Shinde : एकनाथ शिंदेंनी त्र्यंबकेश्वरमधील 'ते' शुल्क रद्द केलं ; म्हणाले, 'दात कोरुन पोट भरत नाही'

पर्यावरण संवर्धन ही सामूहिक जबाबदारी आहे. या जबाबदारीचा एक भाग म्हणून महिन्यातील पहिल्या सोमवारी वाहन न वापरण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामागे प्रदूषण कमी करणे, पर्यावरण संवर्धन, इंधन बचत ही उद्दिष्टे आहेत. यामुळे नागरिकांमध्ये जनजागृती होण्यास मदत होणार असल्याचं जिल्हाधिकारी जलज शर्मा म्हणाले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com