Anandraj Ambedkar On Maratha Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Anandraj Ambedkar On Maratha : “फुकटचे सल्ले देत नाही”; जरांगे पाटलांच्या आंदोलनावर आनंदराज आंबेडकरांचा बोचरा टोला

Anandraj Ambedkar takes a sharp dig at Manoj Jarange Patil’s Maratha reservation protest : मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाचा नववा दिवस; “वारंवार उपोषण केल्याने त्याची धार बोथट झाली, आनंदराज आंबेडकरांची टीका

Pradeep Pendhare

Maratha Reservation Maharashtra : मराठा आरक्षणासह वेगवेगळ्या 13 मागण्यांसाठी जालन्यातील अंतरवाली सराटी बेमुदत उपोषण करणाऱ्या मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाचा आज नववा दिवस आहे. जरांगे पाटील यांच्या आंदोलनावर तोडगा काढण्यासाठी सत्तेतील भाजप महायुती प्रयत्न करत आहे.

जरांगे पाटील यांच्या आंदोलनावर सत्ताधारी आमदार सावध, पण कायदेशीर प्रतिक्रिया देतान दिसत आहेत. यातच रिपब्लिकन सेनेचे अध्यक्ष आनंदराज आंबेडकर यांनी मराठा आरक्षणाबाबत भारतरत्न डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांनी काय भूमिका होती, हे सांगताना जरांगे पाटील यांच्या आंदोलनावर बोचरी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.

अहिल्यानगर दौऱ्यावर असताना, आनंदराज आंबेडकर यांनी माध्यमांशी संवाद साधला. आम्ही जेव्हा मराठा समाजाला (Maratha reservation) सोबत घेऊन सत्तेत येऊ, तेव्हा मराठा समाजाला पूर्ण आरक्षण देऊ, असे सांगताना मराठा समाजाला आरक्षण मिळावे, अशी इच्छा डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनीही व्यक्त केली होती, असा दावा आनंदराज यांनी केला.

मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी जरांगे पाटील (Manoj Jarange) यांच्या नेतृत्वाखाली सुरू असलेल्या आंदोलनावर, आनंदराज यांनी थेट भाष्य करताना, सध्या मला काही बोलायचे नाही. फुकटचे सल्ले मी कोणालाही देत नाही, असा टोला लगावला.

मनोज जरांगे यांच्या उपोषणाच्या भूमिकेला आता त्यांच्या समाजातूनच मोठा विरोध होताना दिसतो आहे. तशी परिस्थिती निर्माण झाली आहे. उपोषण हे प्रभावी हत्यार असते; मात्र वारंवार त्याचा वापर केल्याने त्याची धार बोथट चालली आहे, असेही आनंदराज यांनी म्हटले.

आंबेकरांनी म्हटले, तर मराठा समाजाला संपूर्ण आरक्षण

आम्ही जेव्हा मराठा समाजाला सोबत घेऊन सत्तेत येऊ, तेव्हा मराठा समाजाला पूर्ण आरक्षण देऊ, असे सांगताना मराठा आरक्षणासाठी आपल्याकडे वेगळी भूमिका आणि वेगळा फॉर्म्युला असल्याचे आनंददराज यांनी म्हटले.

जरांगेंचा सत्ताधाऱ्यांना अल्टिमेटम....

आनंदराज यांनी भारतरत्न डाॅ. बाबासाहेबांच्या मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर जो दावा केला आहे, त्यावरून राजकीय वर्तुळात नव्या चर्चांना तोंड फुटण्याची शक्यता आहे. जरांगे पाटील यांनी सत्ताधारी भाजप महायुतीला इशारा देताना 12 सप्टेंबरपर्यंतचा अल्टिमेटम दिला आहे. यानंतर मुंबईतील निर्णायक आंदोलन असेल, असे म्हटले आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT