Rupali Chakankar  Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Rupali Chakankar News: अशोक खरात प्रकरणामुळे अडचणीत, दीड महिन्यानंतर रुपाली चाकणकर पुन्हा 'अ‍ॅक्शन मोड'वर,नवी अपडेट समोर

Ashok Kharat Case: नाशिकमधील भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणात अनेक राजकीय नेत्यांचं कनेक्शन समोर आलं आहे. त्यात रुपाली चाकणकरांनाही खरात प्रकरण चांगलेच भोवलं आहे. खरातसोबतचे फोटो,पाद्यपूजा करतानाचे व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर सुरुवातीला राज्य महिला आयोग अध्यक्षपद आणि नंतर राष्ट्रवादी काँग्रेस प्रदेशाध्यक्षपद अशा दोन मोठ्या पदांचे राजीनामे चाकणकरांना द्यावे लागले होते.

Deepak Kulkarni

Pune News: नाशिकमधील भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणात अनेक राजकीय नेत्यांचं कनेक्शन समोर आलं आहे. त्यात रुपाली चाकणकरांनाही खरात प्रकरण चांगलेच भोवलं आहे. खरातसोबतचे फोटो,पाद्यपूजा करतानाचे व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर सुरुवातीला राज्य महिला आयोग अध्यक्षपद आणि नंतर राष्ट्रवादी काँग्रेस प्रदेशाध्यक्षपद अशा दोन मोठ्या पदांचे राजीनामे चाकणकरांना द्यावे लागले होते. त्यानंतर रुपाली चाकणकर तब्बल सव्वा ते दीड महिना एक सोशल मीडियावरील पोस्ट वगळता सक्रीय नसल्याचं समोर आलं होतं. पण आता त्यांनी सोशल मीडियावरुन नवी अपडेट दिली आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या रुपाली चाकणकर यांनी मंगळवारी (ता.28) सोशल मीडियावरील इन्स्टाग्रामवरुन पुणे जिल्ह्यातील दौंड तालुक्यात असलेल्या नांदूरमध्ये काही लोकांसह बोलताना दिसून आल्या.यावरुन त्या पुन्हा एकदा पक्षात अॅक्टिव्ह झाल्याची चर्चा सुरू झाली आहे.

रुपाली चाकणकर यांनी अशोक खरात प्रकरणानंतर पहिल्यांदाच दौंड तालुक्यातील नांदूरमध्ये बैठकीत बोलताना दिसून आल्या.या बैठकीचे फोटो चाकणकरांनी त्यांच्या इन्स्टाग्रामवरुन शेअर केले आहेत. त्यांनी या बैठकीत काय चर्चा झाली याची माहिती दिलेली नाही. पण या बैठकीचे फोटो शेअर करतानाच गोतावळा असे कॅप्शन दिलं आहे.

नाशिकमधील विकृत भोंदूबाबा अशोक खरात प्रकरण सध्या राज्याच्या राजकारणात चांगलेच गाजत आहे. या प्रकऱणात राजकीय नेते, प्रशासकीय अधिकारी यांच्यावर गंभीर आरोप केले जात आहे. राजकीय वर्तुळात अनेकांचे धाबे दणाणले आहेत. लैंगिक अत्याचार आणि आर्थिक फसवणुकीच्या गुन्ह्यात अटकेत असलेला अशोक खरात हा राज्यातील अनेक बड्या राजकीय नेत्यांनाही अध्यात्मिक मार्गदर्शक असल्याचं बोललं जात आहे. यात महिला आयोगाच्या माजी अध्यक्षा व राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षा रुपाली चाकणकरांचाही समावेश आहे. आता याच चाकणकरांबाबत मोठी अपडेट समोर आली आहे.

रुपाली चाकणकरांनाही अशोक खरातशी जवळचे संबंध असल्याचं समोर आल्यानंतर सुरुवातीला महिला आयोग अध्यक्षपद आणि नंतर राष्ट्रवादी काँग्रेस प्रदेशाध्यक्षपद अशा एकापाठोपाठ दोन मोठ्या पदांचे राजीनामे द्यावे लागले होते. यानंतर भोंदू अशोक खरात प्रकरणात मोठी खळबळ उडवून देणारी बातमी समोर आली होती. ज्यात उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या जीवाला राज्य महिला आयोगाच्या माजी अध्यक्षा रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका असल्याची तक्रार दाखल करण्यात आली आहे. बीडमधील एका व्यक्तीने विशेष तपास पथकाकडे (SIT) ही गंभीर तक्रार नोंदवली आहे.

चाकणकरांकडून त्यांच्याकडून सुनेत्रा पवारांच्या जीवाला धोका असल्याचा सगळ्या प्रकरणावर भाष्य करताना त्यांनी एक फेसबुक पोस्ट केली आहे. त्यामध्ये चाकणकर म्हणाल्या, महाराष्ट्राच्या राजकीय क्षेत्रात आजतागायत अनेकांवर आरोप झाले, त्या आरोपांचे पुरावे माध्यमांनी सबंध महाराष्ट्राला दाखवले व आरोप करणाऱ्यांनीही पुराव्यानिशी आरोप केले. मात्र, आज 28 दिवस होत आहेत, माझ्यावर व माझ्या परिवारावर बेछूट व कपोलकल्पित आरोप हे फक्त हेतूपुरस्सर व बदनाम करण्यासाठी होत आहेत. हे वेळोवेळी समोर येत आहे. याबाबतीत आरोप करणाऱ्यांनी ना पुरावे दिले ना प्रसार माध्यमांनी ते मागितले.

तसेच, निनावी पत्राबाबत जे कोणी आरोप करणारे आहेत त्यांनी सांगावे की ते पत्र त्यांच्यापर्यंत कसे आले? कोणतीही शहानिशा न करता केवळ आणि केवळ बदनामीचा कुटील डाव साध्य करण्यासाठी, पोलीस प्रशासनाला प्राप्त झालेलं एक निनावी पत्र माध्यमांकडे सुपूर्त करून दिवसभर चर्चासत्र घडवून आणले गेले. हे घडवून आणण्यामागे कुणाचे 'सौजन्य' होते हे समोर आले पाहिजे. बीडचे पोलीस अधीक्षक नवनीत कॉवत यांनीही ज्या पत्रावर नाव व पत्ता नाही अशा निनावी पत्राला कायदेशीरदृष्ट्या काहीही अर्थ नसल्याने महत्त्व देता येत नाही, हे माध्यमांसमोर येत स्पष्ट केले आहे .

तरीही, खोडसाळपणा करण्यासाठी हे पत्र कोणी लिहिले, कोठून आले याची चौकशी झालीच पाहिजे. यानिमित्ताने एक नवा चुकीचा पायंडा पाडला जात आहे. केवळ तर्कवितर्क, अंदाज, सुरस कथा आणि रंजक अफवा यांच्या आधारावर मला व माझ्या परिवाराला मानसिक त्रास दिला जातोय. बदनाम केले जात आहे, हे अत्यंत खेदजनक असल्याचं चाकणकरांनी पोस्टमध्ये म्हटलं होतं.

मी पहिल्या दिवसापासून माझी ठाम आणि स्पष्टपणाने भूमिका मांडत आले आहे. खरात प्रकरणात कोणत्याही आर्थिक व्यवहारात, जमीन व्यवहारात व इतर कोणत्याही दुष्कृत्यात दुरान्वये आमचा संबंध नाही. शेवटी सत्य प्रखरतेने समोर येईलच, हा माझा दृढ विश्वास आहे. तरीही गेले काही दिवस प्रसारमाध्यमांमधून माझ्याविरोधी एकतर्फी येणाऱ्या बातम्या यावर मी प्रतिक्रिया किंवा कोणतेही स्पष्टीकरण दिले नाही, कारण SIT व चौकशी करत असलेल्या तपास यंत्रणेला निष्पक्षपणे चौकशी करता यावी हाच हेतू आहे, असं रूपाली चाकणकर म्हणाल्या.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT