Rupali Chakankar-Ashok Kharat  Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Rupali Chakankar SIT Inquiry : रुपाली चाकणकरांची SITकडून साडेपाच तास चौकशी : चौकशीनंतर म्हणाल्या, ‘माझ्या उत्तरांमुळे सर्वांचं...’

Ashok Karat Case : अशोक खरात प्रकरणात रुपाली चाकणकर यांची एसआयटीकडून साडेपाच तास चौकशी करण्यात आली. चौकशीनंतर आपल्या उत्तरांमुळे समाधान झाल्याचा दावा त्यांनी केला.

Vijaykumar Dudhale

Nashik, 10 May : अशोक खरात प्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या रुपाली चाकणकर यांची आज (ता. १० मे) कसून चौकशी करण्यात आली. दुपारी एकच्या सुमारास सुरू झालेली चौकशी सायंकाळी साडेसहापर्यंत चालली. एसआयटीकडून चाकणकर यांची तब्बल साडेपाच तास चौकशी करण्यात आली आहे. चौकशीनंतर माध्यमाशी बोलताना ‘मी दिलेल्या उत्तरांमुळे सर्वांचे समाधान झाले असेल,’ असा दावा चाकणकर यांनी केला.

अशोक खरात (Ashok Kharat) प्रकरणी तेजस्वी सातपुते यांच्या अध्यक्षतेखाली एसआयटीची समिती नेमण्यात आली आहे. या समितीपुढे आज महिला आयोगाच्या माजी अध्यक्षा रुपाली चाकणकर यांची चौकशी झाली. दुपारी एकच्या सुमारास सुरू झालेली चौकशी सायंकाळी साडेसहापर्यंत चालली. म्हणजे तब्बल साडेपाच तास चाकणकर यांची पोलिसांनी कसून चौकशी करण्यात आली.

चौकशीनंतर माध्यमांशी बोलताना चाकणकर म्हणाल्या, एसआयटी पथकाचे जे काही प्रश्न होते, त्या सर्व प्रश्नांची समर्पक अशी उत्तरे मी दिलेली आहेत. मला असा विश्वास वाटतो की, या उत्तरांमुळे या सर्वांचे समाधान झाले असेल.

अशोक खरात प्रकरणात पोलिसांना माझं जसं सहकार्य हवे असेल, तसं मी तपासात पूर्णपणे सहकार्य करणार आहे, असेही रुपाली चाकणकर यांनी स्पष्ट केले.

एसआयटीच्या चौकशीत तुम्हाला काय काय प्रश्न विचारण्यात आले, असे विचारले असता त्या म्हणाल्या की, ते आपल्याला अहवालात समजतीलच. त्यांनी आपली चार तास चौकशी चालली असा दावा केला आहे.

चाकणकर यांचे अशोक खरात याच्यासोबतचे अनेक फोटो व्हायरल झाले होते. तसेच, त्यांनी स्वतः खरात याच्यासोबत आपले संबंध होते, अशी कबुली दिली आहे. तसेच शिवनिका संस्थेत त्या भागीदार होत्या, असेही सांगण्यात येत आहे. त्याच अनुषंगाने त्यांनी समता पतसंस्थेतील सर्व खाती बनावट असल्याचाही दावा केला आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT