Ashok Kharat Shirdi case : अशोक खरात शिर्डी पोलिसांच्या ताब्यात; शेतकरी फसवणूक ते ‘समता’तून फिरलेल्या काळ्या पैशाचं रहस्य उलगडणार?

Ashok Kharat brought to Shirdi by Ahilyanagar police for investigation in farmer fraud, illegal money lending and fake bank accounts case linked to Samata Patsanstha : नाशिकमधील भोंदू अशोक खरात याला शिर्डीतील गुन्ह्यात वर्ग करण्यात आले असून, अहिल्यानगर पोलिस त्याला उद्या न्यायालयात हजर करणार आहेत.
Ashok Kharat Shirdi case
Ashok Kharat Shirdi caseSarkarnama
Published on
Updated on

Ashok Kharat farmer fraud case : शेतकर्‍याची फसवणूक करून, त्याची जमीन गिळंकृत करणे आणि बेकायदेशीर सावकारकी करणे, याशिवाय समता नागरी पतसंस्थेत इतर लोकांचे कागदपत्र वापरून, गैरमार्गाने बँक खाते उघडणे, असे दोन गुन्हे अशोक खरातविरोधात शिर्डी पोलिस ठाण्यात दाखल आहे.

या गुन्ह्यात चौकशीसाठी नाशिकमधील विकृत भोंदू अशोक खरात याचा अहिल्यानगर पोलिसांना ताबा मिळाला आहे. अहिल्यानगरचे पोलिस त्याला, आज सायंकाळी शिर्डीत घेऊन दाखल झाले असून, त्याला उद्या न्यायालयात हजर करणार आहेत. अहिल्यानगर पोलिसांच्या चौकशीत अशोक खरात काय खुलासे करतो? अन् कोणा-कोणाची 'विकेट' पाडतो? याची चर्चा रंगली आहे.

शिर्डीत (Shirdi) अशोक खरात, आणि त्याची पत्नी कल्पना खरात याने राहाता तालुक्यातील निघोज इथले शेतकरी रावसाहेब गोंदकर यांची दहा कोटींची चार एकर जमीन, 5 कोटी 52 लाखांच्या कर्ज व्यवहारात लाटल्याचा आरोप आहे. शिर्डी पोलिसांनी त्यानुसार गुन्हा दाखल केला आहे.

अशोक खरात (Ashok Kharat), कल्पना खरात, किरण नानासाहेब सोनवणे, अरविंद पांडुरंग बावके आणि अशोक परभत तांबे, अशा पाच जणांविरोधात गुन्हा दाखल आहे. या गुन्ह्यात कल्पना खरात ही गेल्या 21 दिवसांपासून पसार आहे. राहाता न्यायालयाने तिचा अटकपूर्व जामीन देखील फेटाळलेला आहे.

Ashok Kharat Shirdi case
Ashok Kharat ED case : 'ED'चा ससेमिरा वाढला; अशोक खरातच्या ताब्यासाठी न्यायालयात अर्ज

तसेच शिर्डीतील समता नागरी पतसंस्थेच्या शाखेत अशोक खरात याने त्याच्या भक्तांचे आधार कार्ड, पॅन कार्ड वापरून, बनावट बँक खाती सुरू केली आहे. ही बँक खाती जवळपास शेकड्यावर आहेत. या बँक खात्यातून कोट्यवधींचे व्यवहार झाले आहे. याप्रकरणी देखील गुन्हा दाखल आहे.

Ashok Kharat Shirdi case
Shirdi Samata Patsanstha : काका कोयटे हजर हो! 'ईडी'चा कडक आदेश; समता पतसंस्थेची धडधड वाढली

महिला आयोगाच्या अध्यक्ष रूपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकर आणि त्यांचा मुलगा, यांची चार खाती आढळली आहेत. या खात्यांवर 2 कोटी 70 लाखांचा व्यवहार झाला आहे. पण प्रतिभा चाकणकर यांनी ही बँक खाती नाकरली असून, अशोक खरात यांनी परस्पर सुरू केल्याचा दावा केला आहे.

दरम्यान, या बँक खात्यावरील व्यवहारप्रकरणी ईडीने प्रतिभा चाकणकर यांना चौकशीसाठी हजर करण्याचा आदेश केला आहे. तसेच समता नागरी पतसंस्थेचे संस्थापक अध्यक्ष काका कोयटे यांना देखील दहा मे रोजीपर्यंत चौकशीसाठी हजर राहावे, असे निर्देश दिले आहे.

असे असतानाच, शिर्डी पोलिसांनी नाशिक 'एसआयटी'कडून अशोक खरात याचा ताबा न्यायालयामार्फत मिळवण्यात यश आलं आहे. अशोक खरात याची या दोन्ही गुन्ह्यात चौकशी होणार आहे. या चौकशीत तो काय खुलासे करतो? कोणते दावे करतो? हे करताना तो कोणती राजकीय 'विकेट' पडतो? याकडे आता सर्वांचे लक्ष लागलं आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com