Kiran Ahir shared a video  Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Sachin Ahir : ठाकरेंनी सगळं काही दिलं, तरीही साथ सोडली ... सचिन अहिरांच्या मुलीने शेअर केला व्हिडीओ, नेमकं काय सांगितलं?

Kiran Ahir shared a video defending her father Sachin Ahir : आदित्य ठाकरेंचे अत्यंत निकटवर्तीय मानले जाणारे आमदार सचिन अहिर यांनी एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेची वाट धरली आहे. ठाकरेंची साथ सोडल्याने त्यांच्यावर टीका होत असून त्यावरच त्यांच्या मुलीने व्हिडीओ शेअर केला आहे.

Ganesh Sonawane

Maharashtra politics : ऑपरेशन टायगर अंतर्गत पक्षातील ६ खासदार फुटल्याने उद्धव ठाकरेंना फोटा धक्का बसला. ठाकरे या धक्क्यातून सावरत नाही तोच एकनाथ शिंदेंनी ठाकरेंना दुसरा धक्का दिला. आदित्य ठाकरेंचे एकनिष्ठ व निकटवर्तीय समजले जाणारे आमदार सचिन अहिर यांनी त्यांची साथ सोडली व एकनाथ शिंदे यांचे बोट धरले. हा आदित्य ठाकरे यांच्यासाठी मोठा झटका होता.

सचिन अहिर यांना बक्षीसी म्हणून शिंदेंनी विधान परिषदेच्या उपसभापती पदाची उमेदवारी दिली. ते बिनविरोध विधान परिषदेच्या उपसभापती पदी निवडून आले. त्यानंतर आदित्य ठाकरेंनी अहिर यांच्यावर तोंडसुख घेतलं. अहिर यांना आम्ही सगळं काही दिलं, तरीही ते सोडून गेले. ते स्वतः आमदार आहेत, त्यांच्या मुलीला मी NGO च्या कोट्यातून प्रभाग समिती दिलीय, भावाला आम्ही बेस्टची समिती दिलेली आहे, भारतीय कामगार सेनेत पद आहे, शिवसेनेत उपनेता पद आहे, बेस्टचे युनियनचे अध्यक्ष आहेत. एवढं सगळं असून अजून काय हवंय? आणखी किती ओरबडणार असा सवाल करत आदित्य ठाकरेंनी अहिर यांच्यावर टीका केली.

दरम्यान, आता सचिन अहिर यांच्या मुलीने इन्स्टाग्रामवर एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये तिने वडिलांनी पक्ष सोडला म्हणून टीका आणि तिरस्कार केला जात आहे यावर सविस्तर आपलं मत मांडल आहे.

सचिन अहिर यांची मुलगी किरण हिने सोशल मीडियावर व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये त्यांनी म्हटलं आहे की, मी किरण सचिन अहिर, सचिन अहिर यांची मुलगी आहे. गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर माझ्या वडिलांवर पक्ष सोडल्याने आरोप होत आहेत. त्यांच्याविषयी सोशल मीडियावर द्वेषपूर्ण संदेश मी बघत आहे. आज मी कोणाशी वाद घालण्यासाठी किंवा कोणाविरुद्ध बोलण्यासाठी येथे आलेली नाही.

मी फक्त एक मुलगी म्हणून, लहानपणापासून जवळून ओळखत असलेल्या माझ्या वडिलांबद्दलचा माझा दृष्टिकोन मांडण्यासाठी येथे आले आहे. मी सर्वाधिक ऐकलेला प्रश्न असा आहे की, "जर त्यांना पक्षाने इतकं काही दिलं होतं, तर त्यांनी पक्ष का बदलला?" या प्रश्नाचं उत्तर देण्यापूर्वी, मला वाटतं आपण एक महत्त्वाची गोष्ट आधी समजून घेतली पाहिजे.

राजकारणाचा खरा उद्देश केवळ एखादं पद मिळवणं नसून, जनतेची सेवा करणं हा आहे. अनेक जण म्हणतात की पक्षाने माझ्या वडिलांना खूप काही दिलं आणि त्या गोष्टीचा मला पूर्ण आदर आहे. पण त्याचबरोबर आणखी एक प्रश्न विचारला गेला पाहिजे.

जर माझे वडील त्या जबाबदाऱ्यांसाठी पात्र नसते, त्यांनी अनेक वर्षे प्रामाणिकपणे, निष्ठेने आणि अखंड समर्पणाने काम केलं नसतं, तर त्यांच्यावर इतक्या महत्त्वाच्या जबाबदाऱ्या सोपवण्यात आल्या असत्या का? पदं ही कुणावर उपकार म्हणून दिली जात नाहीत. ती कठोर परिश्रम, क्षमता, नेतृत्वगुण आणि कालांतराने कमावलेल्या विश्वासाच्या बळावर मिळवावी लागतात.

प्रत्येक नातं हे दोन्ही बाजूंनी टिकत असतं. जसा पक्षाने माझ्या वडिलांवर विश्वास ठेवला, तसंच माझ्या वडिलांनीही त्यांच्यावर सोपवण्यात आलेली प्रत्येक जबाबदारी प्रामाणिकपणे, निष्ठेने आणि अथक परिश्रमाने पार पाडण्यासाठी अनेक वर्षे समर्पित केली. म्हणूनच, कोणत्याही राजकीय निर्णयाबद्दल मत बनवण्यापूर्वी, तो निर्णय घेणाऱ्या व्यक्तीचा संपूर्ण प्रवास समजून घेणं तितकंच महत्त्वाचं आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT