Samata Nagari Patsanstha Shirdi : नाशिकमधील विकृत भोंदूबाबा अशोक खरात याची वारसदार असलेली शेकडो खाते समता नागरी सहकारी पतसंस्थेच्या शिर्डी शाखेत आढळली आहे. ही खाती ज्यांच्या नावावर आहेत, त्यांची शिर्डी पोलिसांकडून कसून चौकशी सुरू आहे. महिला आयोगाच्या माजी अध्यक्षा रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकर आणि तिच्या मुलाच्या नावावर प्रत्येकी दोन, अशी चार खाती आढळली आहे.
या खात्यांमध्ये कोट्यवधींचा व्यवहार झाला असून, पोलिसांना यामागे बेकायदेशीर सावकारकीचा संशय आहे. परंतु प्रतिभा चाकणकर यांनी ही खाती आपली नसूल बनावट आहेत. त्यावरील सह्या देखील बनावट आहे, असा दावा केला आहे. परंतु सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी या खात्यावरील व्यवहारांचे सर्व संदेश प्रतिभा चाकणकर यांना जात होते, असा खळबळजनक दावा केला आहे.
नाशिकमधील अशोक खरात (Ashok Kharat) याची वारसदार असलेली शेकडो खाते समता नागरी सहकारी पतसंस्थेच्या शिर्डी शाखेत सापडली आहे. या खात्यांवर व्यवहार झाले आहेत. कोट्यवधींचा व्यवहार झाले असून, यामागे सावकारकी अन् हवाला व्यवहाराचा शिर्डी पोलिसांचा संशय आहे.
अशोक खरात यांच्याशी अध्यात्मिक संबंध आणि संरक्षण दिल्यावरून रूपाली चाकणकर (Rupali Chakankar) चांगल्याच अडचणीत आल्या. त्यांना महिला आयोगाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा द्यावा लागला. तसेच अजित पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या महिला प्रदेशाध्यक्ष पदावरून देखील पाय उतार व्हावे लागले.
रूपाली चाकणकर यांच्याबरोबरच, त्यांची बहीण प्रतिभा चाकणकर ही अशोक खरात यांच्या संपर्कात होती. शिर्डीत अशोक खरात आणि त्याची पत्नी कल्पना खरातसह पाच जणांविरोधात बेकायदेशीर सावकारकी अन् जमीन व्यवहारातील फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला आहे. यानंतर समता नागरी पतसंस्थेच्या शिर्डी शाखेत अशोक खरात वारसदार असलेली शेकडो खात्यांचा भांडाफोड झाला.
रूपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा आणि तिचा मुलगा यांची प्रत्येकी दोन, अशी चार खाती आढळली आहेत. या चारही खांत्यावर कोट्यवधींची उलाढाल झाली आहे. याप्रकरणी शिर्डी पोलिसांनी प्रतिभा चाकणकर यांच्या दोन पत्यांवर पोस्टाने नोटिसा पाठवल्या होत्या. नोटिसा प्राप्त होताच, पाच दिवसांत चौकशीसाठी हजर होण्याचा आदेश दिला होता. त्यानुसार प्रतिभा चाकणकर हिची आज शिर्डी पोलिसांनी आठ तास चौकशी केली.
प्रतिभा चाकणकर यांच्याबरोबर त्यांचा मुलगा तन्मय देखील होता. पोलिसांच्या चौकशीत प्रतिभा अन् त्यांच्या मुलांनं नेमकी काय माहिती दिली, याचा तपशील समोर आला नसला, तरी या चार खात्यांवर दोन कोटी 40 लाख रुपयांचे व्यवहार झाल्याचं समोर आलं आहे. एवढ्या मोठ्या रकमेचा वापर बेकायदेशीर सावकारकी अन् हवालासाठी करण्यात आल्याचा पोलिसांना संशय आहे.
दरम्यान, प्रतिभा चाकणकर यांनी ही खाती आपली नसल्याचा दावा केला आहे. ही खाती सुरू करताना अर्जावर करण्यात आलेल्या सह्या बनावट आहेत. त्या सह्या आपण केलेल्या नाहीत. खाते व्यवहारात एकही रुपयांची आपली उलाढाल नाही. तसेच पोलिसांनी कोणतीही नोटीस आपल्यापर्यंत पोहोचली नाही, असेही प्रतिभा चाकणकर यांनी म्हटलं आहे.
सामाजिक कार्यकर्ता अंजली दमानिया यांनी मात्र, या खात्यांवरील व्यवहारांची माहिती प्रतिभा चाकणकर यांना मोबाईल संदेशाद्वारे जात होती, असा दावा केला आहे. प्रतिभा चाकणकर यांची पुन्हा चौकशी होऊ शकते, असे पोलिसांकडून सांगण्यात येत आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.