Ashok Kharat : कोट्यवधींचा खेळ 'समता'त! चाकणकर नावाची दोन खाती, अशोक खरातच्या शेकडो खात्यांनी उडवली खळबळ

While probing the bank transactions of Ashok Kharat in Nashik, Shirdi police discovered two accounts under the name Chakankar in Samata Nagari Sahakari Patsanstha Kopargaon : शिर्डी पोलिसांनी समता पतसंस्थेंतील अशोक खरातशी निगडीत असलेल्या खात्यांच्या चौकशीत चाकणकर नावाने दोन खाती आढळल्याने चर्चा होत आहे.
Samata Patsanstha And Ashok Kharat
Samata Patsanstha And Ashok Kharat Sarkarnama
Published on
Updated on

Nashik Ashok Kharat Case : शिर्डी पोलिसांनी नाशिकमधील विकृत भोंदूबाबा अशोक खरात याच्या बँक व्यवहाराचा तपास खणून काढायला सुरवात केली आहे. नाशिक आणि अहिल्यानगरमधील पतसंस्थांमध्ये त्याची शेकडो खाती असल्याचं समोर आलं असून, यातून कोट्यवधीचा व्यवहार झाला आहे.

अहिल्यानगरमध्ये विस्तारलेल्या समता नागरी पतसंस्थेच्या कोपरगाव इथल्या शाखेत पोलिसांना अशोक खरात याच्या व्यवहाराची माहिती घेताना, दोन खाती चाकणकर नावाची आढळल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे.

नाशिकचा (Nashik) भोंदूबाबा अशोक खरात आणि त्याची पत्नी कल्पना खरात हिच्यासह पाच जणांविरोधात बेकायदेशीर सावकारकी आणि जमीन व्यवहारात फसवणूक केल्याप्रकरणी शिर्डी पोलिसांनी गुन्हा नोंदवला आहे. या गुन्ह्यानंतर अशोक खरात याच्या बँक व्यवहाराची पोलिसांनी तपासणी सुरू केली.

यामुळे पोलिसांना (Police) या खात्यावर व्यवहाराचा संशय बळावला आहे. यातच अशोक खरात हा राज्यात आणि राज्याबाहेर मोठं हवाला व्यवहार चालवायचा, अशी देखील पोलिसांना शंका आहे. यातच कोपरगावमधील समता नागरी पतसंस्थेच्या शाखेत एकूण 57 खातेदारांनी 100 खाती आढळली आहेत.

Samata Patsanstha And Ashok Kharat
Bank Fraud : अशोक खरातचा 'बँक'नामा! 400 बँक खात्यांची तपासणी होणार, 130 खाती उघडून कोट्यवधींचा व्यवहार

खरात वारसदार खात्यात कोट्यवधींची उलाढाल

या प्रत्येक खात्याला नॉमिनी म्हणून अशोक खरात याचे नाव आहे. या खात्यांवर सुमारे 60 कोटी रुपयांचा व्यवहार झाला आहे. यामध्ये आठ खाती ही अशोक खरात कुटुंबीयांची आहेत. यामध्ये चाकणकर नावाचेही खातेदार असल्याची माहिती समोर येत आहे. विशेष म्हणजे या सर्व खात्यांशी अशोक खरात याचा मोबाईल नंबर जोडलेला आहे.

Samata Patsanstha And Ashok Kharat
Rahuri Bypoll Crisis : तनपुरेंच्या ‘एकला चलो’ने समीकरणं ढवळली; पवार राष्ट्रवादी-काँग्रेस-ठाकरे शिवसेना 'अ‍ॅक्शन मोड'मध्ये!

रूपाली यांच्या बहिणीचं नाव प्रतिभा

अशोक खरात वारसदार असलेली खाती कुणाच्या नावे आहेत, याबाबत पोलिसांना विचारले असता त्यांनी नावे सांगण्यास नकार दिला. मात्र प्रतिभा चाकणकर व आणखी एक चाकणकर, अशा दोन नावांनी खाते आहेत. महिला आयोगाच्या माजी अध्यक्षा रुपाली चाकणकर यांच्या बहिणीचेही नाव प्रतिभा आहे. त्यामुळे त्यांच्या नावाचं हे खातं आहे का, याची चर्चा आहे.

राजकीय करिअरला धक्का

अशोक खरात याला वाचवण्याच्या नादात अन्, संरक्षण देण्याच्या संशयावरून, अध्यात्मिक संबंधावरून रूपाली चाकणकर यांना त्याच्या राजकीय कारकीर्दला धक्का बसला आहे. महिला आयोगाच्या अध्यक्षपदावर त्याला पायउतार व्हावं लागलं आहे. तसंच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या महिला प्रदेशाध्यक्षपदाचा देखील राजीनामा द्यावा लागला आहे. अशोक खरात याच्या व्यवहारात रूपाली चाकणकर यांचा कितपत सहभाग आहे, यावरून देखील चर्चा आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com