Sameer Bhujbal Followers at Sakora Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Sameer Bhujbal Politics: साकोरा गावात संशयावरून समीर भुजबळ समर्थकांची गाडी ग्रामस्थांनी रोखली

Sameer Bhujbal supporters face villagers' suspicion in Sakora: साकोरा नांदगाव येथे पैसे वाटण्याचा संशय आल्याने ग्रामस्थांनी समीर भुजबळ समर्थकांची गाडी रोखल्याने वाद

Sampat Devgire

Nandgaon News: नांदगाव मतदार संघात सकाळपासून सातत्याने वादविवाद होत आहेत. अनेक ठिकाणाहून नागरिकांनी तक्रार केल्याने पोलिसांची धावपळ उडाली. थेट उमेदवार देखील आमने-सामने आल्याचे प्रकार घडले.

साकोरा (नांदगाव) येथे आज दुपारी अपक्ष उमेदवार माजी खासदार समीर भुजबळ यांचे समर्थक मतदारांच्या भेटीसाठी गेले होते. यावेळी स्थानिक ग्रामस्थांना संशय आल्याने त्यांनी हे गाडी अडवली. भुजबळ समर्थकांना घेराव घातला. त्यामुळे एकच खळबळ उडाली.

साकोरा हे मराठा महासंघाचे उमेदवार डॉ रोहन बोरसे यांचे गाव आहे. या गावात अपक्ष उमेदवार भुजबळ यांचे समर्थक समस्यास्पदरीत्या वावरत असल्याची माहिती मिळाली. काही मतदारांना पैसे वाटले जात असल्याचा संशय होता. त्यामुळे ग्रामस्थ एकत्र आले. त्यांनी संबंधितांकडे विचारना केल्यावर बादाला सुरुवात झाली.

मोठ्या संख्येने जमलेल्या ग्रामस्थांनी त्या गाडीला घेराव घातला. त्यानंतर काही वेळाने पोलीस आले. यावेळी ग्रामस्थ गाडीत बसलेल्या कार्यकर्त्यांना बाहेर येण्यासाठी आरडाओरड करीत होते. पोलीस आल्यानंतर गाडीची तपासणी करण्यात आली.

संबंधित कार्यकर्त्यांकडे देखील विचारना करण्यात आली. मात्र त्यामध्ये काय संशयास्पद आढळले याची माहिती मिळू शकली नाही. मात्र त्यामुळे साकोरे गावात अपक्ष उमेदवार भुजबळ आणि मराठा महासंघाचे उमेदवार बोरसे यांच्या समर्थकांत अर्धा पाऊण तास वादविवाद सुरू होता. त्याची माहिती सबंध मतदार संघात पसरली त्यामुळे कार्यकर्ते आणि मतदारांमध्ये तो चर्चेचा विषय होता.

या संदर्भात भुजबळ समर्थकांनी मतदार संघात मतदान कसे सुरु आहे. त्यात काही अडचणी तर नाही ना याची माहिती घेण्यासाठी आम्ही विविध केंद्रंना भेटी देत आहोत. त्यानुसार साकोरा गावाला भेट देण्यात आली. मात्र काही लोकांनी आमच्याशी अनावश्यक वाद घातला. विविध आरोप केले. मात्र ते सर्व तथ्यहीन होते, असे सांगितले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT