Minister Aditi Tatkare Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Sangamner Acid Attack : शाळकरी चिमुकलीवरील अ‍ॅसिड हल्ल्यानंतर सरकार हललं; आदिती तटकरेंकडून मोठी अपडेट, आई-मावशी घाबरलेल्या, आर्थिक मदतीचा प्रस्ताव

Women and Child Development Minister Aditi Tatkare announces financial assistance under the Manodhairya Scheme for the schoolgirl injured in the Sangamner acid attack : संगमनेर इथल्या अ‍ॅसिड हल्ल्यातील चिमुकलीच्या उपचारासाठी महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी मोठी घोषणा केली आहे.

Pradeep Pendhare

Acid Attack Victim Help : संगमनेर इथं अ‍ॅसिड हल्ल्यातील जखमी चिमुकलीला आणि तिच्या कुटुंबियांसाठी सरकार कार्यवाही सुरू केली आहे.

महिला व बालकल्याण विकास मंत्री आदिती तटकरे यांनी तसा प्रस्ताव ठेवला आहे. मनोधैर्य योजनेतून चिमुकलीला आणि तिच्या कुटुंबियांना मदत केली जाईल, असे मंत्री तटकरे यांनी जाहीर केलं आहे.

मंत्री आदिती (Aditi Tatkare) तटकरे म्हणाल्या, "घडलेला प्रकार निंदनीय आहे. स्थानिक प्रशासन देखील तिथं आहे. लोणीमधील प्रवरा रुग्णालयात तिच्यावर उपचार सुरू असून मुलगी घाबरलेली आहे. प्राथमिक माहितीनुसार, ॲसिड फेकत हल्लेखोरांनी हे कृत्य केलं आहे."

स्थानिक पोलिसांना (Police) कडक कारवाईच्या सूचना दिल्या आहेत. सीसीटीव्हीद्वारे हल्लेखोरांचा माग काढला जात आहे. पण हल्लेखोरांविषयी अद्याप माहिती समोर आलेली नाही. मात्र, स्थानिक पोलिस प्रशासनाला निर्देश दिले आहेत, अधिकाधिक माहिती घ्यावी, असे मंत्री तटकरे यांनी सांगितले.

चिमुकलीच्या कुटुंबीयांसोबत बोलून माहिती घेत आहोत. पण चिमुकली हल्ल्यामुळे घाबरलेली आहे. तिची मानसिक स्थिती सावरल्यावर तिच्याशी संवाद साधला जाईल. चिमुकलीला आणि तिच्या कुटुंबीयांच्या मदतीसाठी मनोधैर्य योजनेतून आर्थिक सहाय्य देण्याच्या प्रस्ताव तयार करत आहोत, असेही मंत्री तटकरे यांनी सांगितले.

चिमुकलीचे कुटुंबीय घाबरलेले

'घटना गंभीर असून आम्ही बारकाईने लक्ष ठेऊन आहोत. चिमुकली आणि तिची आई, मावशी या खूप घाबरलेल्या आहेत. आरोपीला कोणत्याही परिस्थिती सोडलं जाणार नाही, कडक कारवाई केली जाईल,' असेही मंत्री आदिती तटकरे यांनी स्पष्ट केलं.

हल्लेखोरांविषयी माहितीच नाही

दरम्यान, पोलिस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांनी, जखमी चिमुकलीची प्रवरा रुग्णालयात रात्री भेट घेतली. संगमनेर तालुका पोलिस ठाण्यात हल्लेखोरांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हल्लेखोरांविषयी कोणतीही माहिती नाही. परंतु प्राथमिक माहिनीनुसार तपास सुरू आहे, असे पोलिस अधीक्षक घार्गे यांनी सांगितले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT