Jayashree Thorat update Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Jayashree Thorat : चिमुकलीवरचा अ‍ॅसिड हल्ला! चेहरा-डोळा जळालं, बोलणंही कठीण; जयश्री थोरातांनी हेल्थ अपडेट देताच महाराष्ट्र संतापला...

Youth Congress leader Jayashree Thorat shares a health update on the injured schoolgirl, as outrage spreads across Maharashtra : संगमनेर शाळेतील चिमुकली अ‍ॅसिड हल्ल्यात किती गंभीर जखमी झाली आहे, याची अपडेट जयश्री थोरात यांनी दिली आहे.

Pradeep Pendhare

Sangamner acid attack : संगमनेरच्या वडगावपान इथं अ‍ॅसिड हल्ल्यातील जखमी शाळकरी मुलीची हेल्थ अपडेट समोर आली आहे. वडगावपान इथं घटनेचा निषेधार्थ झालेल्या 'रास्ता रोको'मध्ये युवक काँग्रेसच्या (Congress) जयश्री थोरात यांनी, अ‍ॅसिड हल्ल्यानंतर मुलीची प्रकृतीबाबत माहिती दिली.

ही माहिती समोर येताच, आंदोलनातील मुली, गावकऱ्यांनासह संपूर्ण महाराष्ट्रात संतापाची लाट उसळली आहे.

वडगावपान इथल्या 11 वर्षांच्या शाळकरी (School) मुलीवर काल अ‍ॅसिड हल्ला झाला. हल्लेखोरांचा अजून तपास लागलेला नाही. जखमी झालेल्या शाळकरी मुलीची विचारपूस करण्यासाठी जयश्री थोरात यांनी प्रवरा रुग्णालयात धाव घेतली होती.

मुलीवरील वैद्यकीय उपचारांची माहिती घेतल्यानंतर जयश्री थोरात यांनी तिचे आई, मावशी आणि नातेवाईकांना दिलासा दिला. यानंतर आज सकाळी वडगावपान चौफुलीवर झालेल्या रास्ता रोको आंदोलनात त्यांनी सहभागी होत घटनेचा निषेध केला.

या आंदोलनात जयश्री थोरात यांनी मुलीवरचा अ‍ॅसिड हल्ल्याची दाहकता सांगितली. अ‍ॅसिडमुळे चिमुकलीचा चेहरा आणि डोळा खराब झाला आहे. तिला बोलता सुद्धा येत नाही. काय दोष होता तिचा? असा सवाल केला.

जयश्री थोरात यांनी जाहीरपणे मुलीच्या प्रकृतीची अपडेट दिल्यानतंर संगमनेर, अहिल्यानगर जिल्ह्यासह राज्यात संतापाची लाट उसळली आहे. हल्लेखोरांना पकडण्याची मागणीसाठी पोलिस दलावर आता सामाजिक दबाव वाढवला आहे.

परीक्षा काळात पोलिस गस्ती वाढवाव्यात

समाज म्हणून राजकारण, पक्ष ,जात, धर्म ,पंथ बाजूला ठेवून सर्वांनी महिलांच्या सुरक्षिततेसाठी पुढे यावं. ज्यांना माहिती आहे, त्यांनी ती माहिती प्रशासनाला द्यावी. विविध महाविद्यालय शाळा यांच्या परिसरात, शाळा रस्त्यांवर सीसीटीव्ही कॅमेरे आणि परीक्षांच्या काळात पोलिसांच्या गस्ती वाढवाव्यात, अशी मागणी जयश्री थोरात यांनी केली.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT