Vadgaon Pan Protest : पोलिसांची 10 पथकं अलर्टवर; अ‍ॅसिड हल्ल्यात 18 तासांनंतरही हल्लेखोरांचा मागमूस नाही, संतप्त मुली रस्त्यावर...

Vadgaon Pan Protest 10 Police Teams on Alert After Acid Attack: संगमनेर तालुक्यातील वडगावपान इथं शाळकरी मुलीवर अ‍ॅसिड हल्ल्यानंतर संतप्त झालेल्या ग्रामस्थांनी आक्रमक होत आंदोलन केलं.
girls protest after acid attack incident
girls protest after acid attack incidentSarkarnama
Published on
Updated on

Sangamner Acid Attack Case: संगमनेर तालुक्यातील वडगावपान इथं सहावीतील शाळकरी मुलीवर अ‍ॅसिड हल्ल्याचे पडसाद विधिमंडळात उमटले. हल्लेखोराला पकडण्यासाठी अहिल्यानगर पोलिस दलाची 10 पथकं तैनात आहेत. पण हल्ला होऊन 18 ते 20 तास उलटून गेली तरी, हल्लेखोर सापडलेला नाही.

संगमनेर तालुक्यातील मुली संतप्त होऊन, आज सकाळीच रस्त्यावर उतरल्या. वडगावपान इथल्या चौफुलीवर रास्ता रोको आंदोलन केलं. आंदोलनात युवक काँग्रेसच्या जयश्री थोरात आणि आमदार अमोल खताळ यांच्या पत्नी नीलम खताळ सहभागी झाल्या होत्या.

शाळा (School) सुटल्यानंतर घरी जात असताना, सहावीमधील शाळकरी मुलीवर दोघांनी दुचाकीवरून येत अ‍ॅसिड हल्ला केला. या हल्ल्यातील हल्लेखोरांच्या शोधासाठी पोलिसांची गेल्या 18 ते 20 तासांपासून धावपळ सुरू आहे. पण पोलिसांच्या हातात अजून काही सापडलेलं नाही.

दरम्यान, संगमनेर (Sangamner) तालुक्यातील शाळकरी मुलींनी या हल्ल्याचा संताप व्यक्त करत असून, रास्ता रोको केला. आंदोलनात सहभागी झालेल्या मुलींनी अ‍ॅसिड हल्ल्यावर संताप व्यक्त करताना, सुरक्षितेची मागणी केली.

girls protest after acid attack incident
Sangamner Acid Attack : शाळकरी चिमुकलीवरील अ‍ॅसिड हल्ल्यानंतर सरकार हललं; आदिती तटकरेंकडून मोठी अपडेट, आई-मावशी घाबरलेल्या, आर्थिक मदतीचा प्रस्ताव

'अशा घटनांमुळे शाळेत यायला भीती वाटू लागली आहे. कधी कोण मागून येऊन हल्ला करेल, अशी भीती वाटते. असुरक्षित वाटत असून, सरकारने यावर काहीतरी ठोस कार्यवाही करायला हवी. शाळकरी मुलींसाठी सरकारकडून उपाययोजना झाल्याच पाहिजे,' अशी मागणी आंदोलनात सहभागी झालेल्या मुलींनी केली.

girls protest after acid attack incident
Sangamner Acid Attack : सहावीतील मुलीवर अ‍ॅसिड हल्ला; विधिमंडळात संतापाचा स्फोट! पटोले कडाडले, कायंदे गरजल्या तर, विखे म्हणाले...

हल्लोखोरांचा मागमूस लागेना

हल्लेखोर हे गावातील असल्याचा सुरवातीला अंदाज व्यक्त केला जात होते. ते अल्पवयीन आहेत, असं सांगितलं जात होतं. घटनेनंतर राजकीय नेत्यांच्या तशा प्रतिक्रिया येत होत्या. मात्र पोलिस अधीक्षकांनी हल्लेखोरांचा तपास केला जात असून, त्याबाबत कोणतीही माहिती समोर आलेली नाही, अशी प्रतिक्रिया दिली आहे.

हल्लेखोराच्या शोधाचं पोलिसांसमोर आव्हान

पोलिस अधीक्षकांच्या या प्रतिक्रियेमुळे पोलिस यंत्रणेसमोर हल्लेखोर शोधण्याचं आव्हान निर्माण झालं आहे. मुलीच्या नातलगांपासून ते वर्ग मैत्रिणी, शिक्षकांपर्यंत सर्वच पातळीवर पोलिस तपास करत आहे. परंतु पोलिसांनी अजून हल्ल्याचा उलगडा करण्यात यश आलेलं नाही. दरम्यान, हल्ल्यातील शाळकरी मुलीची प्रकृती स्थिर असल्याचं सांगितलं जात आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com