Balasaheb Thorat Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Balasaheb Thorat Politics: थोरातांनी सत्ताधाऱ्यांसह विरोधकांना संगमनेरमध्ये एकटवलं; एक रेल्वे मार्ग बदलल्याचे धक्के थेट मुख्यमंत्री फडणवीसांपर्यंत...

Sangamner Balasaheb Thorat Nashik Pune Railway Politics Nashik Leaders MP Rajabhau Vaje's warning to the government-नाशिक पुणे सेमी हाय स्पीड रेल्वेसाठी संगमनेरच्या भूमिकेला पाठिंबा, नाशिकच्या खासदारांचाही इशारा!

Sampat Devgire

Rajabhau Waje News: नाशिक पुणे सेमी हाय स्पीड रेल्वेचे प्रश्नावर विरोधक एकवटले आहेत. यामध्ये माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या भूमिकेला पुण्यासह नाशिकच्या नेत्यांनीही पाठिंबा दिला आहे. या प्रश्नावर विरोधक एकवटल्याचे चित्र आहे.

नाशिक पुणे हाय स्पीड रेल्वे हा तीन जिल्ह्यांचा कळीचा मुद्दा आहे. नगरच्या काही नेत्यांनी मोडता घालत ही रेल्वे शिर्डी कडे वळवण्याचा प्रयत्न केला. त्या विरोधात काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांनी सरकारला घेरण्याचा इशारा दिला आहे.

या प्रश्नावर गेले काही दिवस संगमनेर हे राजकारणाचे केंद्र बनले होते. आता त्याला पुणे आणि नाशिकच्या नेत्यांनीही पाठिंबा दिला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे खासदार डॉ अमोल कोल्हे आणि नाशिकचे राजाभाऊ वाजे या दोन्ही खासदारांनी थोरात यांच्या भूमिकेला पाठिंबा दिला.

या संदर्भात सोमवारी संगमनेर येथे विरोधक एकवटले. यावेळी माजी मंत्री थोरात यांसह आमदार सत्यजित तांबे, डॉ अजित नवले, खासदार भाऊसाहेब वाकचौरे, माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील, सदाशिव लोखंडे, आमदार शरद सोनवणे, डॉ किरण लहामटे, आमदार बाबाजी काळे, यांसह तिन्ही जिल्ह्यांचे नेते एकत्र आले. त्यांची मोट बांधण्यात माजी मंत्री थोरात यशस्वी झाले.

नाशिक पुणे रेल्वे हा संगमनेर मार्गे थेट पुण्याला न्यावा. त्याला शिर्डी कडे वळवून काही नेते राजकारण करीत आहे. हा विकासाला अडथळा आहे. केवळ सत्तेत राहून विकास कामांमध्ये अडथळा आणणाऱ्या या नेत्यांना आवरावे, असा इशारा यावेळी देण्यात आला.

या संदर्भात लवकरच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेण्यात येईल. कोणत्याही परिस्थितीत नाशिक पुणे रेल्वेच्या मूळ प्रस्तावात आणि मार्गात कोणताही बदल करू नये, हा केवळ राजकीय विषय नाही. उत्तर महाराष्ट्र आणि पश्चिम महाराष्ट्राच्या विकासाशी निगडित विषय आहे, असे खासदार डॉ कोल्हे यांनी यावेळी सांगितले.

या प्रश्नावर आता संवाद आणि आंदोलन या दोन्ही मार्गांचा समतोल वापर करण्यात येईल. नाशिक पुणे रेल्वे या परिसरासाठी अत्यंत आवश्यक आहे. त्याला कोणीही फाटे फोडू नये. ते जनतेच्या भावनांचा अनादर ठरेल, असे आमदार सत्यजीत तांबे यांनी सांगितले.

या निमित्ताने नगर जिल्ह्यातील नेत्यांमधील राजकारणाचा फटका नाशिक पुणे रेल्वेला बसत आहे. या संदर्भात काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांनी हा विषय पुढे आणला आहे. यामध्ये नाशिक आणि नगरसह पुण्याच्या लोकप्रतिनिधींनीही त्यांना समर्थन दिले. त्यामुळे नगरच्या विरोधकांना यातून संदेश देण्यात ही बैठक यशस्वी झाली.

-------

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT